आज २० एप्रिल २०२२ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  20 Apr 2022, 8:31 PM
   

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा वाढविण्यास मान्यता. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करुन त्यासाठी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय. (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)

मुंबईतील मौजे मनोरी (ता. बोरीवली) येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टला भाडेपट्ट्याने मंजूर शासकीय जमिनीचा भाडेपट्टा पुढील ३० वर्षासाठी नुतनीकरणाचा निर्णय. (महसूल विभाग)

तिरुपती देवस्थानास नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणीसाठी भूखंड प्रदान करण्याचा निर्णय (नगरविकास विभाग)

पुणे महानगर मेट्रो रेल्वे टप्पा -१ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्यास मान्यता  (नगरविकास विभाग)

महसूल वाढीसाठी विद्यमान एफएल-२ परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता. (गृह विभाग)

काजूबोंडे, मोहाफुले पासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्य असा दर्जा देण्याचा आणि या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी धोरण.  

    Post Views:  325


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व