नवी दिल्ली: अकोला विधान परिषद निवडणूक चुरशीची झाली. पण या निवडणुकीत आम्हाला आघाडीची पूर्ण मते मिळाली नाहीत. त्यामुळे विश्वासाला कुठे तरी तडा जात असून आता आघाडीतील तिन्ही पक्षांनी त्यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे, असं विधान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलं आहे. अकोल्यातील पराभवानंतर शिवसेनेकडून पहिलीच जाहीर प्रतिक्रिया आली आहे.
अकोला विधान परिषदेत आमच्याकडे आकडा नव्हता. पण आमचा उमेदवार तगडा होता. तीन वर्ष ते सलग निवडून आले आहेत. या निवडणुकीत आघाडीकडे एकूण 408 मते होती. भाजपची स्वत:ची 225 मते होती. वंचित आघाडी आणि इतरांची मिळून त्यांचाही आकडा 400वर गेला होता. म्हणजे दोन्ही पक्षाकडे समसमान मते होती. पण आमची शंभर टक्के मते आम्हाला मिळायला हवी होती. ती मिळाली नाही. शिवसेनेची मते नगण्य आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते सर्वाधिक आहे. त्यामुळे कुठे तरी विश्वासाला तडा जात आहे. पण कोण्या एका पक्षाला दोष देऊन चालणार नाही, असं सावंत म्हणाले. विश्वासाला तडा हा आघाडीतील सर्व पक्षांशी संदर्भात आहे. कुण्या एका पक्षाला दोष देत नाही. आम्हीही त्यावर विचार केला पाहिजे. हा पराभव आमच्यासाठी धक्कादायक आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आमचा मतदारांवर विश्वास पाहिजे. इतरांची मते मळायला हवी होती. आमची शंभर टक्के मते मिळायला हवी होती. आमच्या तीन पक्षाची शंभर टक्के मते मिळाली नाही याचा अर्थ विश्वासाला तडा जातोय. कसा जातोय याची माहिती आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनादेऊ. बाकीच्या पक्षप्रमुखांनीही त्यावर गंभीरपणे पाहावं, असं ते म्हणाले.
शिवसेनेती अंतर्गत वादाचा या निवडणुकीत फटका बसला का? असा सवाल केला असता सावंत यांनी त्याला होकारात्मक असं उत्तर दिलं. आमच्या पक्षा अंतर्गत धुसफूस नसेलच असं म्हणणार नाही. असेलही. पण तेवढ्याने पराभव होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Post Views: 264
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay