अध्यात्मिक कार्यक्रमातून धर्म जागृत होतो - ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे


 विश्वप्रभात  08 Dec 2025, 8:55 PM
   

राजेवाडी - दया असेल तर धर्म जागृत होतो. धर्माचे ठिकाणी खरे सुख असते. धर्माची निर्मिती प्रत्यक्ष परमेश्वराने केली आहे असे वेदात सांगितले आहे. सत्ययुग,  त्रेता युग , द्वापार युग व कलियुगातही धर्माचे प्राबल्य आहे. धर्माने वागणाऱ्या मनुष्याचे धर्म रक्षण करतात. त्यामुळे धर्माचे रक्षण करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी धर्माने वागावे धर्म करावा. अधर्माचा नाश ठरलेला आहे. धर्म जागृती साठी धर्माचरण महत्त्वाचे आहे यासाठी अध्यात्मिक ,धार्मिक कार्यक्रम घेणे महत्त्वाचे आहे. अध्यात्मिक ,धार्मिक,कार्यक्रमातून धर्माची जागृती होते, असे मत ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. श्री दत्तात्रय( दादा महाराज) जगताप यांच्या कृपाशीर्वादामुळे येथे औदुंबर भक्त मंडळ, चिदानंद भक्त परिवार, नाशिक, सद्गुरू श्री शंकर महाराज भक्त परिवार चाकण व समस्त ग्रामस्थ मंडळी राजेवाडी यांच्या वतीने येथे अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम, श्री स्वामी समर्थ दत्त मठ राजवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे यांना हिंदु रत्न पुरस्कार दिल्ली येथे प्राप्त झाल्याबद्दल श्री दत्तात्रय (दादा महाराज) जगताप यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर रवींद्र भोळे यांचे प्रवचनाचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ह भ प बापूसो महाराज गायकवाड वाघापूर यांनी डॉ.रवींद्र भोळे यांचा परिचय करून देताना सांगितले की उरुळी कांचन येथे अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा डॉ.भोळे देत असून सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय, अध्यात्मिक, नैसर्गिक आपत्ती,  इत्यादी क्षेत्रांमध्ये त्यांनी महान कार्य केलेले आहे , पुरंदर पूर्व भागात त्यांनी वैद्यकीय योगदान दिलेले हे. डॉ.रवींद्र भोळे यांनाभारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शंकर झरड पाटील सामाजिक कार्यकर्ते, व्यासपीठ चालक ह भ प बापूसो महाराज गायकवाड, सदाशिव कांबळे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनाही सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

    Post Views:  34


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व