मलकापूरच्या डॉ. राजेंद्र गोडे फार्मसीला राष्ट्रीय मानांकन दर्जा


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  30 Sep 2023, 11:24 AM
   

अकोला ः इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयास राष्टी्रय मुल्यांकन आणि प्रमाण परिषदेतर्फे राष्ट्रीय मानांकन देण्यात आले असून अमरावती विद्यापीठातून बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यातील खाजगी महाविद्यालयांपैकी नॅक दर्जा प्राप्त करणारे हे प्रथम फार्मसी महाविद्यालय ठरले आहे. 
कुठल्याही महाविद्यालयाचा शैक्षणिक गुणवत्ता ही त्यांच्या शैक्षणिक दर्जासोबतच विद्यार्थ्यांना आवश्यक असणार्‍या विविध सोयी व सुविधांच्या पडताळणी वर अवलंबून असतो. काटेकोर शिक्षकांमधून ही पडताळणी करून राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रमाण परिषदेतर्फे राष्ट्रीय दर्जा मानांकन देण्यात येत असतो. हा दर्जा असणे प्राप्त करणे महाविद्यालयाला अनिवार्य केलेले आहे. या परिपूर्तीसाठीच  १२ व १३ सप्टेंबर रोजी नॅक समितीतर्फे या महाविद्यालयाला नुकतीच भेट देण्यात आली होती. यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासक्रमाचे नियोजन, प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता, संशोधनकार्य, समाजोपयोगी उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी व सुविधा, क्रीडा या निकषानुसार परिपूर्तीची माहिती सादर  करण्यात आली.त्याचप्रमाणे सांस्कृतीक विभागाची कामगिरी, पर्यावरणपुरक योजना, उत्कृष्ट कार्य व महाविद्यालयाचे वेगळेपण याबाबतचा अहवाल प्राचार्य डॉ. प्रशांत के. देशमुख यांनी सादर केला. यापूर्वी त्यांच्या संशोधन प्रस्तावाला सुध्दा नुकताच पेटेन्ट प्राप्त झालेला आहे.
महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ. वैभव एस. अढाव यांनी समितीला पडताळणीसाठी आवश्यक असणारे संपुर्ण दस्त सादर केले. या पडताळणी मधूनच नॅक समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयास राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेद्वारे मुल्यांकन प्राप्तीचा दर्जा देण्यात आला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र गोडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. मलकापूर येथील डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय हे जिल्ह्यातुन औषध निर्माण शास्त्र (फार्मसी) महाविद्यालयापैकी पहिले नॅक मानांकन प्राप्त महाविद्यालय ठरले आहे.
            अतिसुक्ष्म तंत्रज्ञानाने कर्करोगावरील संशोधनात यशस्वी ठरून राष्ट्रीय,आंतराष्ट्रीय ख्याती प्राप्त करणारे डॉ.प्रशांत कृष्णराव देशमुख यांच्या योग्य प्रशासकीय आणि कर्तृत्ववादी वाटचालीने हे महाविद्यालय अधिक प्रगतीकडे वाटचाल करीत आहे.डॉ.प्रशा़त देशमुख यांच्या संशोधन प्रस्तावाला नुकताच पेटेन्ट मिळालेला असून लगेच मिळालेले मानांकन हा या महाविद्यालयाला प्राप्त दुसरा बहूमान आहे.

    Post Views:  128


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व