अकोला : दि.०२/०१/२०२३ रोजी एका अल्पवयीन मुलीला पळवुन नेवुन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला वि.जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. एस. जे. शर्मा साहेब यांनी विशेष सत्र खटला कं. १०१/२०२२ या प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता केली. दि.०२/०१/२०२३ रोजी सदर प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी की, पिडीता ही अकोला येथील रहिवाशी असुन आरोपीसोबत तिचे सुत जुडले असल्याने ती स्वतःहुन आरोपीकडे घरून निघुन गेली. व त्यानंतर पोलीस स्टेशन खदान अकोला येथे येवुन पिडीतेची आई व पिडीता हिने आरोपी विरूध्द रिपोर्ट दिला. त्यावरून आरोपीला अटक करण्यात आले होते. परंतु सबळ पुराव्याअभावी वि.न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. व्ही. जी. मंढरे, अॅड. दिपक जैन, अॅड. सुर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.
Post Views: 240
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay