कान्हेरी सरप येथील कुख्यात गुंड स्थानबध्द


 संजय देशमुख  28 Jan 2022, 8:18 PM
   

अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप येथील कुख्यात गुंड सतिष उर्फ टग्या अशोक तायडे (३०) याचेवर एमपीडीए ॲक्टनुसार कारवाई करीत त्याला एक वर्षासाठी कारगृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. 
त्यावर यापुर्वी दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, अश्लिल शिवीगाळ करणे, अवैध रित्या शस्त्र बाळगणे, धमकी देवून खंडनी मागने असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापुर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तो प्रतिबंधक कारवाईलासुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवून पोलिस अधीक्षकांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी अकोला यांना सादर केला होता. त्यानुसार एक वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहात त्याला स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश २८ जानेवारी रोजी पारीत केला. कारवाई पूर्ण करण्याकरिता पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी, मूर्तिजापूर उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, मंगेश महल्ले यांनी तसेच पो.स्टे. बार्शीटाकळी येथील सहा.पोलिस निरीक्षक मनोज लांडगे तसेच पो.स्टे. तील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 
आतापर्यंत ५६ गुन्हेगारा स्थानबध्द
 जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती संकलीत करण्यात आली. त्यांचे विरूध्द एम.पी.डी.ए. ॲक्ट खाली कारवाई प्रस्तावति असून, माहे-जुलै २०२० ते जानेवारी २०२२ या कालावधी मध्ये एमपीडीए कायद्यान्वये एकूण ५६ गुन्हेगारांनावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे.

    Post Views:  173


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व