वॉर फाऊंडेशन च्या उदघाटन समारंभास शेकडो महिलांनी उपस्थित राहून दिला उत्स्फूर्त प्रतिसाद
आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी वॉर संस्थेसोबत कार्य करून विकास साधावा : ज्येष्ठ समाजसेविका - झिंगु
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
18 Jul 2026, 10:31 AM
मुर्तीजापुर : मध्यमवर्गीय होतकरू कष्टकारी महिलांच्या उत्कर्षासाठी आणि आर्थिक स्वावलंबनाच्या हेतूने महिलांना विविध योजनांबरोरच वेगवेगळ्या प्रकारचे लाभ संस्थेच्या माध्यमातून मिळून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच बरोबर ज्या महिला व पुरुष संस्थेचे सभासद होणार यांना या सर्व सुविधा मिळणार तर आहेच, शिवाय त्यांच्या मुला मुलींना शिवणकला , ब्युटी पार्लर आणि भरती पुर्व सैनिकी प्रशिक्षण विनामूल्य राहण्याच्या आणि भोजनाच्या व्यवस्थेसह देणार असल्याचे आपल्या मर्गदर्शनातून संस्थापक दिपक पाटील दांदळे यांनी जाहीर केले.
दि. 12 जुलै 26 रविवार रोजी भगवंत लॉन येथे समिक्षक साहित्यिक , समाज प्रबोधक सुधारक प्रा.डॉ.श्रीकांत तिडके यांच्या हस्ते उघाटन झालेल्या या संस्थेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जेष्ठ समाज सेविका राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्रीमती झिगुबाई बोलके होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा शिवसेना नेते मा. अश्विन भाऊ नवले , विर भगतसिंग बहु. संस्थेचे अध्यक्ष शंभाजी ब्रिगेड चे संजय गुप्ता यांच्या सह अमरावती अकोला वाशिम यवतमाळ चे जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांची उपस्थिती होती.
शासकीय योजनांची माहिती आणि त्यांचे लाभ मिळवून देणाचे प्रयत्न करणारी दिपक दांदळे यांच्या नेतृत्वात कार्य करणारी संस्था वॉर फाऊंडेशन या संस्थेत सभासद , सदस्य होऊन सहभागी महिलांनी संस्थापक अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या योजनांचा लाभ घेवून आपल्या परिवाराच्या उत्कर्षासाठी या संधी फायदा घेण्याचे आवाहन कवयित्री समाजसेविक झिंगुबाई बोलके यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून केले. यावेळी त्यांनी सुरेल स्वरात काव्यगायण देखील केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल डाहेलकर यांनी सुत्रसंचलन महेंद्र नागलकर यांनी केले तर आभार प्रल्हाद शेलोरकर यांनी मानले.
Post Views: 60