सोशलमिडीयाच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी सुरू झाले ग्रंथालय
उत्तराखंडातील गावात मुलांचा अभिनव उपक्रम
Sanjay M. Deshmukh
2021-11-24
डेहराडून : व्हॉट्स अॅप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या आणि अस्पष्ट माहितीचा सुकाळ आहे. यामुळे सर्वांत जास्त नुकसान तरुणांचेच होत आहे.
या अर्धवट माहितीमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी पौडी जिल्ह्यातील केबर्स नावाच्या गावात एक लायब्ररी सुरू झाली आहे. जेणेकरून लहान मुले व किशोरवयीन मुले पुस्तकांद्वारे योग्य माहिती मिळवू शकतील. सरपंच कैलाशसिंग म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात 56 तरुण शहरातून गावात आले होते. सोशल मीडियावर येणार्या संदेशावरून त्यांच्यात मतभेद होत असत. बर्याच वेळा आपसात मारपीटसुद्धा होत असे. ग्रामीण भागातील लोकांना या चुकीच्या माहितीपासून वाचविण्यासाठी लायब्ररी सुरू करण्यात आली. जेणेकरून त्यांना खरी माहिती मिळून तथ्याची जाणीव होईल. पण यासाठी मुलांनी पुस्तके वाचणे आवश्यक आहे. भावी काळ इंटरलेफ्ट आणि डेटाचा आहे. विशेष म्हणजे लायब्ररीमध्ये हँडपिक्ड वर्ल्ड लिटरेचरसोबत प्रख्यात लेखकांचे साहित्य आहे. त्यात बाल साहित्याला प्राधान्य देण्यात येत आहे. डेहराडून येथील प्रगतिशील पुस्तक केंद्र आणि मुस्कान उत्तराखंडने लायब्ररी तयार करण्यासाठी टीम उपलब्ध करून दिली आहे. या टीमचे एक सदस्य कुलदीप यांनी सांगितले की, या लायब्ररीत पर्यावरण व शेतीविषयक पुस्तके आहेत. सस्टेनेबल टुरिझमसाठी पर्यावरण सुरक्षा ही पहिली अट आहे. पर्यावरणाची जागृती पुस्तकांमुळेच येईल, असे टीमचे म्हणणे आहे. पसरपंच रावत म्हणाले की, आम्ही इतिहास वर्तमानाशी जोडून टुरिझमचे एक सस्टेनेबल मॉडेल तयार करीत आहोत. यासाठी लॉकडाऊनमध्ये नोकर्या गमावलेल्या लोकांना तरुणांसोबत मिळून परफॉर्मिंग आर्ट्स गावाशी जोडत आहोत. जेणेकरून व्हिलेज टुरिझमच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करता येईल. गावात परफॉर्मिंग आर्ट मजबूत करण्याचेही प्रयत्न होत आहेत. रशियन कथाकार अंतोन चेकॉव्ह लिखित कथेच्या आधारावर नील सीमोनचे संगीत नाटक ’ये क्या मजाक है?’ नुकतेच रंगमंचावर आणण्यात आले.
Post Views: 266