चेतन दिलीप धोडी यांच्या कडून पत्नीला वारंवार अमानुष मारहाण


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  10 Dec 2022, 8:27 PM
   

बोईसर -(संतोष घरत )-बोईसर येथील भाजपचे जिल्हा परीषद सदस्य श्री. चेतन दिलीप धोडी यांच्या कडून पत्नीला वारंवार अमानुष मारहाण करून छळ करीत, पर स्री बरोबर अनैतिक संबंध असल्याचे पत्नीने केले तक्रारीतून उघड.......
पालघर जिल्ह्यातील नावाजलेली बोईसर ग्रामपंचायतीवर नव्याने विराजमान झालेले थेट सरपंच श्री. दिलीप धोडी यांचा मुलगा भाजप पक्षातून निवडून येत जिल्हा परीषद सदस्य पदावर कार्यरत असलेला श्री. चेतन धोडी हा त्याचे पत्नीला वारंवार करीत असलेल्या मारहानिबाबत आणि एका परस्त्री बरोबर असलेले अनैतिक संबंधाबाबत चर्चेत आला असून बोईसर एमआयडीसी पोलीस ठाणे येथे NCR NO. 1508/2022, दिनांक - 7 डिसेंबर 2022 रोजी 323, 504, 506 कलमांतर्गत गुन्हाची नोंद करण्यात आलेली आहे. यापूर्वीही एका स्री ला भर रस्त्यात मारहाण करण्यात आलेली होती, तसेच इतर गंभिर गुन्हेही दाखल आहेत... जनतेने निवडून देत काही ना काही कारणावरून वादाच्या भोवऱ्यात असणारे बोईसर येथील भाजप पक्षाचे जिल्हा परीषद सदस्य श्री. चेतन धोडी यांची चौकशी होऊन पक्ष, शासन, प्रशासनाचे अधिकारी याची माहिती घेऊन तातडीने कारवाई करणार का ? कारण स्थानिक पातळीवर विकासाच्या दृष्टीने जनतेने निवडून दिले असताना विकास राहिला बाजूला परंतू याचे काम हे अजबच !!जनतेतून असेही बोलले जात आहे की, पक्ष श्रेष्ठींनी याकडे बारकाईने लक्ष देऊन त्यांच्या पत्नीला होणारी मारहाण, छळ, अन्याय यावर मार्ग काढून तक्रारदार - सौ. जयश्री चेतन धोडी हिला न्याय देण्यासाठी पुढे आले पाहिजे. तसेच पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांकडे ही तक्रार करणार आहेत. असे गुन्हे करणाऱ्या पदाधिकारी याची पक्षांतर्गत किंवा शासनाकडून चौकशी होणार की पाठराखण ? या प्रकरणा कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Post Views:  240


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व