सौ.अनुजा भोसले प्राइड ऑफ महाराष्ट्र अवार्ड ने सन्मानित
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Sep 2025, 8:45 AM
अकोला : पूनम प्रोडक्शन च्या बॅनर खाली गोकुलपुरे का प्राइड ऑफ महाराष्ट्र सिझन ४ अमरावती येथे आयोजित केला गेला. ह्या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात महिला मॉडल ह्यांनी भाग घेतला. हा कार्यक्रम तापडिया सिटी सेंटर मॉल अमरावती येथे भव्य स्वरुपात आयोजित केला गेला.
ह्या कार्यक्रमाच्या आयोजिका पूनम गोकुलपुरे ह्या असून , ज्युरी म्हणून गगनदीप सिंह (मिस्टर इंडिया ) डॉ. एलिझा (मिस ट्रांस इंडिया वर्ल्ड एंड यूनिवर्स) डॉ. गणेश, मिस वैशाली भगत यांनी काम पाहिले. ह्या कार्यक्रमात अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. अनुजा अक्षय भोसले ह्या मिसेस कॅटेगरी मध्ये विजेता झाल्या असून त्या जुळ्या मुलांच्या आई आहेत.
त्यांना प्राइड ऑफ महाराष्ट्र सीझन ४ हा अवार्ड तारक मेहता का उलटा चश्मा फेम चकोरी उर्फ स्वाती शर्मा ह्याच्या शुभ हस्ते देण्यात आला.
ह्या आधी त्यांना जागतिक अधिपरिचारिका दिना निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे आदर्श परिचारिका 2025 हा पुरस्कार देखील मिळालेला असून आता त्या महाराष्ट्राच्या फेम बनल्या आहेत.
Post Views: 49