तुकईवाडी शाळेत प्रवेशोत्सव साजरा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  15 Jun 2023, 3:51 PM
   

जि प प्राथ शाळा तुकईवाडी येथे इयत्ता पहिलीच्या मुलांचे स्वागत ट्रॅक्टर मध्ये बसून मिरवणुकी द्वारे प्रभात फेरी काढून करण्यात आले आहे.  

     विद्यार्थ्यांना नवीन शाळेत प्रवेश घेतानाचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून केक कापण्यात आला. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप तुकईवाडी ग्रामपंचायतचे सरपंच कुसुमताई भांबुरे,प्रवीणजी कोरडे माजी सरपंच संपतजी थिगळे ग्रामपंचायत सदस्य तुकईवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाषजी कोरडे यांच्या हस्ते नव्याने शाळेत पदार्पण झालेले शिक्षक विजयकुमार शेटे आणि  शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दक्षताताई कोरडे यांचाही शाल श्रीफळ देऊन सरपंच ताईच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित प्रसिद्ध बातमीदार अशोकजी कोरडे, व्यवस्थापन समितीचे सदस्या ज्योत्सनाताई भांबुरे,सुषमाताई पडवळ व उपस्थित होते. कार्यक्रमास मार्गदर्शन खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी जीवनजी कोकणे, केंद्रप्रमुख कल्पनाताई टाकळकर , व्यवस्थापन मुख्याध्यापिका नीलम आढारी, आभार विजयकुमार शेटे यांनी मानले.

    Post Views:  522


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व