माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांची स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनला माझोड येथे सदिच्छा भेट
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2024-02-29
आज दि.२५ फेब्रुवारी २०२४(वार:-रविवार)रोजी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजितदादा तांबे यांचे वडील नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार मा.डॉ.सुधीर तांबे यांनी माझोड येथे स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा. राजेश पाटिल ताले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन गेल्या १० वर्षांपासून अकोला जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहे.माझोड या गावातून सुरू झालेला स्वामी विवेकानंद ग्रुप आज शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्रभर नावारूपाला येत आहे,ग्रुपचे हे उल्लेखनिय कार्य बघून डॉ सुधीर तांबे यांनी माझोड मध्ये येऊन स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशनला सदिच्छा भेट देऊन ग्रुपच्या पदाधिकारी व सदस्यांसोबत चर्चा केली.
स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन गाव तिथं वाचनालय या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी अकोला जिल्हाभर करीत असलेले कार्य अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन डॉ.सुधीर तांबे यांनी केले.
Post Views: 308