सार्वजनिक बांधकाम विभागात अंदाधुंद कारभार सुरू असल्याचा आराेप करीत स्वतंत्र इंजिनीअर्स व काॅन्ट्रॅक्टर असाेसिएशनने साेमवारी धरणे आंदाेलन केले. मागण्या मान्य न झाल्यसा तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशाराही असाेसिएशनने दिला आहे. निविदा प्रक्रियेतही भाग घेणे अशक्य असल्याची भावना आंदाेलकांनी व्यक्त केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ते, शासकीय इमारती, दुरुस्तीची कामे कंत्राटदारांतर्फे करण्यात येतात. मात्र सर्व पात्र कंत्राटदारांना समान काम मिळत नसल्याचा आराेप यापूर्वी झाला आहे. शासकीय कामे करणारे सुशिक्षित बेराेजगार अभियंता व कंत्राटदारांना मिळत नसल्याचा आराेप स्वतंत्र इंजिनीअर्स व काॅन्ट्रॅक्टर असाेसिएशनने केला आहे. ही कामे मिळत नसल्याचे सुशिक्षित बेराेजगारांच्या उदरनिर्वाह प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान साेमवार, 26 डिसेंबर राेजी असाेसिएशनने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर मंडप टाकत धरणे आंदाेलन केले. आंदाेलनात असाेसिएशनचे अध्यक्ष मनाेज भालेराव, चेतन सुरेका, माे. रिजवान माे अफसर, विनोद खंडारे, नरेश चाैधरी, दिलीप क्षिरसागर, हरिष पांडे, अतुल शर्मा, देवेंद्र ओझा, आरिफ नियाजी, हिमांशु ताेलंबे, प्रफुल्ल निकष, सिद्धार्थ बागडे, आशीष भाेंडे, माे. फैजान आदी सहभागी झाले.
पत्रव्यहारानंतरही काम मिळेना
कंत्राटदारांना समानपद्धतीने काम मिळत नसल्याने कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे कळविण्यात आल्याचे स्वतंत्र इंजिनीअर्स व काॅन्ट्रॅक्टर असाेसिएशनचे म्हणणे आहे. मात्र या पत्रव्यवहाराचा काहीच उपयाेग झाला नसून, या प्रकाराला वाचा फाेडण्यासाठी आणि सर्वांना न्याय हक्क मिळावेत, यासाठी आंदाेलन करण्यात आल्याचे असाेसिएशनचे म्हणणे आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव
सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी - कर्मचारी दबावाखाली काम करीत असल्याचे असाेसिएशनचे म्हणणे आहे. अनेक कंत्रटादारांना नाेंदणी करून दाेन-तीन वर्षे झाल्यानंतरही काम मिळाली नाहीत. विशिष्ट कंत्राटदारांमुळेच अन्याय हाेत असून, कामाच्या स्पर्धेतही भाग घेता येत नाही. निविदा भरताना दबाव तंत्राचा वापर करण्यात येताे, असाही आराेप असाेसिएशने केला आहे.
Post Views: 153
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay