निस्वार्थ रुग्णसेवा परिवाराकडून सूर्योदय बालगृहातील मुलांसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Aug 2025, 3:15 PM
निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य हा परिवार सतत उपक्रम राबवत असतो रक्तदान संदर्भातच नाही तर अन्नदान, शासकीय स्पिटलमध्ये व विविध बालिकाश्रम मध्ये वस्त्र,नाश्ता,जेवण असे उपक्रम राबवत असतो. दि.16/08/2025 रोजी निस्वार्थ रूग्णसेवा परिवाराकडून सूर्योदय बालगृह मलकापूर येथील मुलांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात संपन्न झाला तो घेण्याचा उद्देश बालगृहातील मुलांना भाऊ बहिणीचे प्रेम लाभो त्यासाठी रक्षाबंधनाचे हे नाते खूप मौल्यवान असते. तेथील मुलांना शालेय वस्तू भेट दिल्या व नाश्ता वाटत करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे अध्यक आदरणीय सौ.अर्चनाभाभी शर्मा, प्रमुख पाहुणे सौ.चंदाताई शर्मा (माजी महिला मोर्चा महानगराध्यक्ष तथा महानगर उपाध्यक्ष भाजपा), महिला मोर्चा महानगराध्यक्ष भाजपा सौ.वैशालीताई शेळके, माजी महापौर तथा नगरसेविका सौ.सुमन ताई गावंडे, खडकी मंडळाध्यक्ष सौ प्रणिता समरीतकर, महानगर सचिव सौ.अस्मिता वगारे,सौ.उज्वला भरणे, सौ.अश्विनी महानकार,सौ.माया मेंढे,सौ.शिका तायडे,सौ.लीना चिम,सौ.सुषमा जावंदिया,सौ.सपना मगर, गौरी सरोदे,प्रमुख उपस्थिती प्रभाग क्र.20 नगरसेवक श्री.विनोद मापारी,श्री.राजु वगारे,सचिन देशमुख,विजय टोळे,अमोल क्षिरसागर,रविन्द्र येवतकर,अभिजित मुळे,संग्राम इंगळे, विशाल गुंजाळे,जाधव सर,यश गिरे,सचिन सातपुते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता शेळके आणि आभार प्रदर्शन निस्वार्थ रूग्णसेवा परिवार संस्थापक सचिव अतुल भांगे यांनी केले..
Post Views: 111