अकोला : बुद्धीबळ खेळातून एकाग्रता विकसित होत असल्यामुळे त्याचा उपयोग मुलांच्या अभ्यासामध्ये देखील होतो. स्पर्धकांनी शालेय स्तरावरील स्पर्धे पुरतेच मर्यादीत न राहता बुद्धीबळाचा सराव कायम ठेवावा, त्यायोगे त्यांच्यामध्ये खेळाचा नवा आयाम विकसित होत असल्याचे प्रतिपादन द बेरार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता यांनी केले. प्रभात किड्स स्कूल येथे मंगळवार दि. २९ नोव्हेंबर रोजी आयोजित अकोला जिल्हा ग्रामीण शालेय बुद्धीबळ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पूणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला आणि प्रभात किड्स स्कूल येथे आयोजित अकोला जिल्हा ग्रामीण शालेय बुद्धीबळ स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ चेंबर ऑफ कार्मसचे अध्यक्ष निकेश गुप्ता उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी भुषविले. महानगर बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष संदीप पुंडकर, सचिव जितेंद्र अग्रवाल, बुद्धीबळ फेडरेशनचे पंच प्रवीण ठाकरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा स्पर्धेतील सहभाग स्पर्धेतील यशापेक्षाही महत्त्वाचा असतो. खेळातील अपयश काही शेवटीची नसते तर त्यातून जिंकण्याची जिद्द प्रबळ व्हायला पाहीजे असल्याचे अॅड. मोतीसिंह मोहता म्हणाले.
बुद्धीबळातून बुद्धीचा विकास होत असून त्या माध्यमातून आपण कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त करु शकत असल्याचा विश्वास निकेश गुप्ता यांनी व्यक्त केला. कोविडमुळे जडलेले मोबाइलचे व्यसन टाळण्यासाठी मुलांसाठी खेळ महत्वाचाच आहे. विद्यार्थ्यांनी खेळातून स्पर्धा गुणांचा अंगीकार करण्याची गरज डॉ. गजानन नारे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण ठाकरे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन प्रभातचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांनी केले.
अॅड. मोहता यांचा हृद्य सत्कार
महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदाची निवडणूक जिंकल्याबद्दल त्यांचा हृद्य सत्कार डॉ. गजानन नारे यांचा हस्ते करण्यात आला. अॅड. मोहता हे सामाजिक व शैक्षणिक चळवळीचे भान असलेले व्यक्तीमत्त्व असून त्यांच्या संकल्पातून विद्यापीठस्तरावर तळागाळातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्न होणार असल्याचा आशावाद डॉ. नारे यांनी यावेळी व्यक्त केला.
ग्रामीण भागातील स्पर्धकांचा बुद्धीबळ स्पर्धेत सहभाग
जिल्हाभरातून आलेल्या २१० स्पर्धकांनी या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला असून प्रभातच्या भव्य सभागृहात १४, १७ व १९ वर्षाखालील स्पर्धकांच्या स्पर्धा अत्यंत नियोजनबद्ध रितीने घेण्यात आल्या.
Post Views: 155
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay