अनधिकृत बांधकाम करून शासकीय यंत्रणेला वारंवार त्रास देणाऱ्या सलाम खानवर फौजदारी कारवाईची मागणी


सदर प्रकरणाची चौकशी करून लवकरच कारवाई केली जाईल : सुनील शिंदे - तहसीलदार पालघर
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Feb 2023, 12:53 PM
   

बोईसर : (संतोष घरत) - मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रातील मौजे सरावली - अवधनगर येथील स.नं ९२ या महाराष्ट्र सरकार जमिनीवर सलाम खान नामक व्यक्ती गेल्या तीन वर्षांपासून अनधिकृत इमारतीचे बांधकाम करत असून तहसीलदार सुनील शिंदे यांनी देखील दोन वेळा तोडक कारवाई करून देखिल तहसिलदारांच्या कारवाईला न जुमानता सरकारी जागेवर पुन्हा एकदा सलाम खान अनधिकृत बांधकाम करून बहुमजली इमारत उभी करत आहे.
मौजे सरावली स.नं ९२/२१ जमिन सरकार जमा झालेल्या जमिनीवर सलाम खान नामक व्यक्ती अनधिकृत बांधकाम करून इमारत उभी करत असल्याचे अहवाल सरावली तलाठ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार सुनील शिंदे यांनी दोन वेळा तोडक कारवाई केली होती. परंतु काही महिन्यांनंतर लगेचच सलाम खान यांनी पुन्हा एकदा बांधकाम करून इमारत उभी केली आहे. मुख्य म्हणजे मंडळ अधिकारी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यालगत सुरू असलेल्या सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकाम स्थानिक तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत सुरू आहे. सदर अनधिकृत बांधकामाला लागणारे बांधकाम साहित्य देखील विना रॉयल्टी असल्याचे बोलले जात आहे. तहसीलदार सुनील शिंदे यांनी तोडक कारवाई करून सदर सरकारी जागा बंदिस्त करत ताब्यात घेतली असती तर पुन्हा त्याच जमिनीवर सलाम खान यांनी बांधकाम केले असते का असा सवाल तेथील नागरिक उपस्थित करत आहे तर तहसीलदारांनी केलेल्या कारवाई नंतर देखील सलाम खान यांनी त्याच सरकारी जागेवर बांधकाम करून सरकारी यंत्रणेला वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न केला बाबत फौजदारी कारवाई का करू नये असा देखील सवाल तेथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान सरावली - अवधनगर येथील सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकामांना तेथील काही ग्रामपंचायत सदस्य बांधकामांना लागणारे साहित्य पुरवत त्या बांधकामांना संरक्षण देत असल्याचे वृत्त समोर येत आहे.

    Post Views:  132


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व