कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत कोणत्याही परिस्थितीत काम करायला आवडणार नाही.
बिहारच्या (Bihar) राजधानीत (Patna) निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांनी एका मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केलीय. जर भविष्यात संधी मिळाली, तर नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांच्याऐवजी नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासोबत पुन्हा काम करायला आवडेल, असं त्यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय. दरम्यान, किशोर यांनी नितीश कुमार हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यापेक्षा चांगले मुख्यमंत्री असल्याचंही म्हंटलंय.
एका मुलाखतीदरम्यान किशोर यांना विचारण्यात आलं की, त्यांना कोणत्या नेत्यासोबत काम करायला आवडणार नाही? त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचं नाव घेतलं. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत कोणत्याही परिस्थितीत काम करायला आवडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय, राहुल गांधी (Rahul Gandhi) पंतप्रधान होण्याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं, राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात. तसेच, गांधी घराण्याशिवाय काँग्रेस चालू शकतं. मात्र, काँग्रेसच्या इतर नेत्यांनाही असं करायचं असेल तरच हे शक्य आहे. तुम्ही कोणत्या पक्षात प्रवेश करणार, या प्रश्नावर किशोर म्हणाले, कोणत्या पक्षात जाण्याचा प्रश्न येतच नाही. आम्ही स्वत:चाही पक्षही काढू शकतो, अशीही त्यांनी कबुली दिली.
यापूर्वी प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) कौतुक केलं होतं. ते म्हणाले, मोदींसारखा सध्या देशात दुसरा कोणताही नेता नाही. तसेच, काँग्रेसशिवाय देशात प्रबळ विरोधी पक्ष निर्माण होऊ शकतो, असंही ते म्हणाले. याचवेळी रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितलं, की उत्तर प्रदेशात 2022 च्या विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election 2022) भाजप (BJP) प्रचंड बहुमतानं विजयी होईल, अशीही त्यांनी ग्वाही दिली.
Post Views: 206