लांब मिशा कापल्या नाहीत पोलीस कॉन्स्टेबलला केले निलंबित
भोपाळ-- पोलीस दलात चालक असलेल्या एका कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यूनिफॉर्मबाबत शिस्तीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका कॉन्स्टेबलवर ठेवण्यात आला आहे. वारंवार सूचना देऊनही पोलीस कॉन्स्टेबलने लांब मिशी कापली नाही. यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली, असं सांगण्यात येतंय.
आपल्या अनोख्या स्टाइलमुळे पोलीस दलतील कर्मचारी आणि अधिकारी कायम चर्चेत असतात. आता मध्य प्रदेश पोलीस दलात चालक म्हणून तैनात असलेल्या एका हवालदाराला (कॉन्स्टेबल) लांब मिशा ठेवणे महागात पडले आहे. कॉन्स्टेबलने सेवाशर्तींचे उल्लंघन केल्याचे विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच कॉन्स्टेबलला स्टाइल बदलण्यासाठी तंबीही दिली होती. पण कॉन्स्टेबल आपल्या आग्रहावर ठाम राहिला. यामुळे या कॉन्स्टेबलला विभागाने निलंबित केले आहे. मध्य प्रदेशात हे प्रकरण सध्या चर्चेत आहे.
लांब मिशा कापल्या नाहीत, पोलीस कॉन्स्टेबलला केले निलंबित
निलंबित कॉन्स्टेबल राकेश राणा विशेष पोलीस महासंचालक (को-ऑपरेटिव्ह फ्रॉड आणि लोकसेवा हमी) यांचा चालक म्हणून कार्यरत होता. कॉन्स्टेबल राकेश राणाने स्टायलिश मिशा ठेवल्या आहेत. विभागाने कॉन्स्टेबलचे यूनिफॉर्म तपासला होता. त्याने गळ्याभोवती विचित्र डिझाइनमध्ये केस आणि मिशा वाढवल्याचे दिसून आले. हे यूनिफॉर्मला साजेसे आणि नियमानुसार नव्हते. कॉन्स्टेबल अत्यंत वाईट दिसून आला. यानंतर विभागाने कॉन्स्टेबल राकेश राणा याला केस आणि मिशा व्यवस्थित कापण्याच्या सूचना दिल्या.
विभागाने सूचना देऊनही कॉन्स्टेबल आपल्या आग्रहावर ठाम राहिला. त्याने आपल्या मिशा कापल्या नाहीत. यामुळे कॉन्स्टेबलने यूनिफॉर्म सेवेतील शिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका विभागाने ठेवला. तसेच या कृत्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवरही विपरीत परिणाम होत असल्याचेही विभागाने सांगितले. त्यामुळे या कॉन्स्टेबलला विभागाने तत्काळ निलंबित केले आहे. निलंबित कर्मचाऱ्याला नियमानुसार निर्वाह भत्ता दिला जाईल, असे विभागाने म्हटले आहसोशल मीडियावर कॉन्स्टेबलचे फोटो व्हायरल झाले आहेत. लांब मिशीमुळे कॉन्स्टेबलला आपल्याच विभागातील काही अधिकारी वैतागले होते. कॉन्स्टेबलला मिशा कापण्याच्या सूचनाही अनेकदा देण्यात आल्या होत्या. पण कॉन्स्टेबलने नकार देत मिशा तशाच ठेवल्या.
Post Views: 296