मुर्तिजापूर येथे पौष्टीक शालेय पोषण आहार वाटप कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती सम्राट डोंगरदिवे, शिक्षण विभागाचे उपसंचालक शिवलींग पटवे, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, नगर परिषदेचे मुख्यधिकारी विजय लोहकर, सत्यसाई अन्नपूर्णा संस्थेचे समन्वयक संतोष अलाट, मनोज गवई, जिल्हा समन्वयक अधीक्षक संतोष अग्रवाल आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात पालकमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित मुलांना साईश्योर मल्टी न्युट्रीशन हेल्थ मिक्सचे वाटप करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधतांना पालकमंत्री कडू म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळेल याकरीता प्रयत्न करु. तसेच शिक्षण विभागाच्या सहकार्याने सत्यसाई अन्नपुर्णा संस्थेमार्फत पौष्टीक शालेय पोषण आहार वाटप सुरु झाले असून मुर्तिजापूर नगरपरिषद असा उपक्रम राबविणारी पहिलीच नगरपरिषद असल्याबद्दल पालकमंत्री कडू यांनी कौतूक केले.
Post Views: 363
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay