जि.प. प्राथ. मराठी शाळा चिंचोली गणू येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Jan 2023, 8:42 AM
   

अकोला - जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा चिंचोली गणू पंचायत समिती बाळापुर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमा शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून विविध प्रकारे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर माहिती सांगितली. ह्या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विमल शिवचरण डोंगरे सौ भटकर मॅडम श्री रेवासकर सर श्री भटकर सर व वाडकर सर यांनी सुद्धा सावित्रीबाई यांच्या जीवनावर माहिती विद्यार्थ्यांना दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ प्रज्ञा पारवे यांनी सावित्रीबाई फुले यांना हार अर्पण केला तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी पुष्प देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनेश भाटकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री वाडकर सर यांनी केले.

    Post Views:  277


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व