धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त घारोड येथे रोगनिदान शिबिर संपन्न
आरोग्य शिबिरात ३००च्या वर रुग्णांनी घेतला लाभ
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
22 Oct 2022, 2:34 PM
खामगाव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव अकोला ग्रामीण जिल्हा प्रभारी मा श्री धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त घारोड येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळा पार पडले या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव मा श्री धनंजय देशमुख ह्यांच्या हस्ते संपन्न झाले सुरुवातीला शाहू,फुले,आंबेडकर यांच्या प्रतिमेचे संयुक्त पूजन करून दीप प्रज्वलन व छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ह्यावेळी मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य मा श्री गजानन वाकुडकर,मा श्री प्रितम माळवंदे,जिल्हा युवक काँग्रेसचे मा श्री मयूर हुरसाड, मा श्री ऍड शहजादउल्हा खा ,मा श्री निखिल मुळे ,मा श्री अंकित दोडे, मा श्री सचिन जैस्वाल ,मा श्री निलेश इंगळे मा श्री प्रमोद महाजन, मा. श्री जसवंत सिंग शीख मा श्री डॉ जाधव,प्राथमिक आरोग्य केंद्राचे मा श्री डॉ तेलंग, डॉ राजपूत, डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे चे डॉ जीवन सर,जेष्ठ समाजसेवक बाबुराव इंगोले, माजी सरपंच भास्कर डांगे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

याच कार्यक्रमांमध्ये मा श्री धनंजय देशमुख यांचा ए एस वाय ग्रुपचे अध्यक्ष अनंता नरवाडे ,दिलदारखा पठाण,सुनील इंगोले,वैतखा, फिरोजखा, पत्रकार सचिन ठाकरे, यांच्यासह ग्रुपच्या सर्व सदस्यांनी पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन वाढदिवसाचा शुभेच्छा देऊन सन्मान केला. कार्यक्रम प्रास्तविक शाहू-फुले-आंबेडकर फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन ठाकरे यांनी केले. संचलन मिशन वात्सल्य समिती सदस्य वैभव ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन कामगार नेते सुनील इंगोले यांनी केले. आरोग्य शिबिरात ३४० च्या वर रुग्णांनी लाभ घेतला ह्यामध्ये हदयरोगाच्या ६८रुग्ण, मध्यमेह, दमा १२४ रुग्ण ,२२ रुग्णांची टू डी इको तपासणी करण्यात आली अनेकांची डोळे तपासणी ६५ व हाडांचे ४७ व किडनी, मुतखडा असे एकूण ३४०रुग्णांची तपासणी ह्या आरोग्य शिबिरात करण्यात आली असून जवळपास ४८ च्या वर लाभ घेतला. पुढील पुढील आठवड्यात जवळपास ४० रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया येणार करण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिरासाठी एस वाय ग्रुपचे दिलदार खान पठाण, सुनील इंगोले अनंता नरवाडे वैतखा खान पठाण, विलास इंगोले, सचिन दांदळे, संजय धोत्रे,फिरोजखा पठाण,विनायक मारोती इंगोले, गजानन इंगळे, सात्विक परकाळे, नितेश खरात, अंगणवाडी सेविका नलिनी इंगळे, आशा सौ. कणकलता इंगोले, अनिल गवई आदी उपस्थित होते.
Post Views: 205