हक्क मागताना कर्तव्याची जाणीव ठेवणे म्हणजे संविधान मंत्राचे पालन करणे होय : जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  28 Nov 2022, 8:47 AM
   

उरुळीकांचन : सर्वांना आर्थिक, राजनैतिक, व सामाजिक स्वातंत्र, समानता, बंधुता, व राष्ट्रीय एकात्मता प्रवर्धित करण्याचा अधिकार संविधानाने दिला. 25 नोव्हेंबर 1949 ह्या दिवसी संविधान राष्ट्राला अर्पण करण्यात आले.26जाने 1950पासून ते लागू झाले. संविधानाने आपल्याला स्वातंत्र, बंधुता व समानतेचे हक्क दिलेत. स्वच्छ पर्यावरणाचे अधिकार दिलेत पर्या वरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारीही दिली. संविधानातील हक्क मागताना राष्ट्रांच्या हितासाठी आपले कर्तव्यही महत्वाचे आहेत. हक्क मागताना कर्तव्याची जाणीव ठेवणे म्हणजे संविधान रुपी मंत्राचे तंतोतंत पालन करणे हे होय असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ मणी भाई देसाई प्रतिष्ठान ह्यांनी येथे व्यक्त केले. एन वाय के युवा कल्याण, क्रीडा मंत्रालय भारत सरकार संलग्नित तसेच निती आयोग भारत सरकार संलग्नित पद्मश्री डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून राष्ट्रीय संविधान दिननिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ह्या वेळी भारतीय संविधानाचे वाचन करुन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सूचना व शपथ देण्यात आली.ह्या कार्यक्रमाला आदर्श शेतकरी चांगदेव म्हस्के, काळू ढवळे, युवा कार्यकर्ते अभिषेक जवळकर, ह भ प कुमार टिळेकर, बाळकृष्ण काकडे, सुनील तुपे,  अमोल भोसले, एल डि साळवे व डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

    Post Views:  215


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व