आईच्या कष्टाचं सोनं – दोन्ही भावंडांची शासकीय सेवेत भरारी
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
15 Sep 2025, 8:59 AM
कापशी रोड : वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण संसाराचा भार एका आईच्या खांद्यावर आला. कठीण परिस्थितीतही तिने हार न मानता मुलांच्या शिक्षणाची गोडी जपली आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जिवाचे रान केले. आज तिच्या त्यागाचं सोनं झालं असून दोनही मुलांनी शासकीय सेवेत भरारी घेत आईचे स्वप्न साकार केले आहे.
अजय शाम डोंगरे यांची निवड महापारेषण (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) ,व महावितरण (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी या दोन्ही निवड मध्ये झाली आहे, तर सौरभ शाम डोंगरे यांची महावितरण (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) मध्ये तंत्रज्ञ या पदावर पदोन्नती झाली आहे. परिश्रम, चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर या भावंडांनी सरकारी सेवेत प्रवेश करून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
घरची आर्थिक परिस्थिती कठीण असतानाही आईने न थकता मुलांच्या शिक्षणासाठी झगडत राहिली. तिच्या त्याग, मेहनत आणि जिद्दीला आज मुलांनी यशाचा मुकुट चढवला आहे. या यशामुळे डोंगरे परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नातेवाईक, गावकरी आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अजय आणि सौरभ यांच्या यशस्वी प्रवासामुळे गावातील तसेच परिसरातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळणार आहे.
Post Views: 20