अकोला - प्रा. मधू जाधवांसारखा स्पष्टक्ता आणि निर्भिड व्यक्तिमत्वाची आज समाजाला खर्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश पुखराज बोरा यांनी केले. प्रा. मधू जाधव अमृत महोत्सवी सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी सभा मंचावर लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, नागपूर येथील रंगकर्मी सौ. रुपाली मोरे (कोंडेवार) आणि महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ. आशा मिरगे, सन्मानमूर्ती प्रा. मधू जाधव व सौ. मिना जाधव यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात कु. लावण्या भोसले हिने सादर केलेल्या नांदीने करण्यात आली. अकोल्यातील ज्येष्ठ पत्रकार, रंगकर्मी प्रा. मधु जाधव यांचा 75 व्या वाढदिवसानिमित्य अमृत महोत्सवी सोहळा प्रभात किड्स स्कूलच्या सभागृहात 19 एप्रिल रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अकोल्यातील ज्येष्ठ कलावंत मित्रमंडळी तसेच प्रा. मधु जाधव यांचे शिष्य यांनी आपली आवर्जून उपस्थिती दर्शविली. प्रभातच्या संचालिका सौ. वंदना नारे, स्नेहल गावंडे, इंदुताई देशमुख, सौ. भूमिका भोसले, वृषाली जाधव, अनिता जाधव, सुषमा जाधव, रोशनी जाधव, रंजना जाधव किरण जाधव, दिपाली जाधव, उमा जाधव यांच्या हस्ते प्रा. मधु जाधव यांचे औक्षवण व 75 दिव्यांनी ओवाळणी करून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कु. अदिती अभिनय जाधव हिने मधुर गीत गायन केले. याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी प्रा. मधु जाधव यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलुंवर प्रकाश टाकला. प्रा. मधु जाधव यांच्यासोबत काम केलेल्या नाट्यकलावंतांमध्ये खटोड गुरुजी, ओंकारमल धुत, गणेश घुगे, शालिनी सुळे, अॅड.मंगला पांडे, अॅड. विनोद साकरकर, अशोक ढेरे, शशिकांत जोशी, विश्वास बोराळे, राजकुमार उखळकर, डॉ. सुमेधा हर्षे यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. मधु जाधव यांच्या विद्यार्थ्यांनी देखील याप्रसंगी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी केले तर या बहारदार सुत्रसंचालन प्रशांत गावंडे व अक्षय राऊत यांनी केले तर आभार बी.एस. देशमुख यांनी मानले.
Post Views: 52
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay