शिक्षक आमदार किरणजी सरनाईक यांच्या हस्ते शिवराजे जामोदे सर यांचा सत्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  26 Mar 2025, 2:23 PM
   

तेल्हारा : महाराष्ट्राचे निसर्ग कवी, शिवराजे जामोदे सर यांच्या सेवा निवृत्ती  निमित्त शिक्षक आमदार किरणजी सरनाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपालदास मल्ल हे होते.तेल्हारा येथील शेठ बन्सीधर विद्यालयाच्या शताब्दी समोरामध्ये झालेल्या या सत्काराप्रसंगी संस्थेची उपाध्यक्ष राजेंद्र  शहा, विलास  जोशी, ऐतिहासिक नाणे संग्रहक देशमुख सर, ओमप्रकाश झुनझुनवाला, शहा  आदी मान्यवरांची उपस्थिती होती. दिनांक 22 मार्च ला झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून आलेल्या हजारो माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
शिवराजे जामोदे हे आडसूळ येथील मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयातून 33 वर्ष सेवा देऊन निवृत्त झाले. सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक, साहित्यिक , पत्रकारिता,क्षेत्रामध्ये ते संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखले जातात. वैशिष्ठ म्हणजे जामोदे सर यांनी त्यांच्या शिक्षणीक जीवनाचा प्रारंभ  सेठ बंसिधर विद्यालयातूनच केलेला होता. महाराष्ट्रातील विविध दैनिकांमधून त्यांचे स्तंभ लेखन, तसेच काव्य लेखन प्रकाशित होत असते. अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये यांचा सहभाग असतो.

    Post Views:  76


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व