अकोला : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापनादिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ दि. १ मे रोजी सकाळी ८ वाजता लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे होणार आहे.
मुख्य कार्यक्रमात राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजवंदन होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ७.१० वा. ध्वजवंदन समारंभ होईल.
मुख्य शासकीय समारंभाच्या अनुषंगाने शास्त्री क्रीडांगणाची स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट आदी कामे तत्काळ पूर्ण करावीत. पथसंचलनाच्या सरावाच्या दृष्टीने मैदान परिसर सुस्थितीत करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बैठकीद्वारे संबंधित यंत्रणाप्रमुखांना दिले. पथसंचलन तयारी, पेयजल, आरोग्य पथक, रूग्णवाहिका, चित्ररथ आदी सुविधा व तयारीच्या अनुषंगाने निर्देश देण्यात आले.
Post Views: 1
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay