अकोला जिल्हा परीषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने आमसभा संपन्न


भाऊराव लांडे अध्यक्षपदी कायम, प्रदीप खाडे, प्रेमचंद खत्री उपाध्यक्ष, वसंत कुळकर्णी सचिव तर अशोक मांग
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  24 Aug 2023, 1:21 PM
   

अकोला  -  अकोला जिल्हा परीषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची आमसभा जि.प. कर्मचारी कल्याण भवनात संपन्न झाली.  सभेच्या अध्यक्ष स्थानी संघटनेचे अध्यक्ष श्री भाऊराव लांडे गुरुजी होते.  संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप खाडे, उपाध्यक्ष प्रेमचंद खत्री, सचिव वसंतराव कुळकर्णी, कोषाध्यक्ष अशोक मांगुळकर, सदस्य जे. के. खान, युसुफ इकबाल, बाळकृष्ण रोकडे, भरतराव आपोतीकर, अरुण साकरकर याप्रसंगी प्रामुख्याने हजर होते.
            सभेच्या प्रारंभी संघटनेतील सर्व दिवंगत सदस्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. संघटनेच्या स्थापनेस ५ वर्षे पुर्ण झाली असुन पुढील ५ वर्षासाठी सद्या कार्यरत असलेली कार्यकारणी कायम ठेवण्याचा निर्णय सभेस उपस्थित असलेल्या सर्व सभासदांनी एकमताने घेतला. त्यानुसार आता संघटनेच्या अध्यक्षपदी भाऊराव लांडे हेच कायम राहणार असुन उपाध्यक्ष पदावर प्रदीप खाडे व प्रेमचंद खत्री कायम राहणार असुन सचिव पदावर वसंतराव कुळकर्णी तर कोषाध्यक्ष अशोक मांगुळकर यांची पुन्हा वर्णी लागली आहे. सदस्य पदावर जे.के. खान, ईकबाल युसूफ,  भरतराव आपोतीकर गंभीरराव जाधव व अरुण साकरकर कार्यरत राहतील.

        सभेत संघटनेने आजवर केलेल्या कार्याचा व सदस्यांच्या सोडविलेल्या समस्या आदींचा आढावा सचिव वसंतराव कुळकर्णी यांनी सादर केला. अध्यक्ष भाऊराव लांडे, उपाध्यक्ष प्रेमचंद खत्री, प्रदीप खाडे, कोषाध्यक्ष  अशोक मांगुळकर यांनी याप्रसंगी  आपले मनोगत व्यक्त करुन, सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे व समस्यांचे निराकरण केले. संघटनेचे कामकाज अधिक सुलभ व्हावे व कर्मचा-यांच्या समस्या प्रशासना समोर अभ्यासपुर्ण रितीने मांडता याव्यात या करीता संबंधीत संवर्गातुन निवृत्त झालेल्या झालेल्या तज्ञ कर्मच्या-यांची विभागनिहाय समिती तयार करण्याचा महत्वपुर्ण निर्णय आमसभेत घेण्यात आला. 
          या प्रसंगी आमसभेच्या स्नेहभोजनास रु. १० हजार देणगी दिल्याबद्दल कार्यकारणी सदस्य बाळकृष्ण रोकडे; तसेच सेवानिवृत्ती नंतर विशेष समाजसेवा करीत असल्याबद्दल नरेंद्र देशपांडे व गजानन वानखडे यांचा सत्कार करण्यात आला. सभेस फेसकाचे अतिरीक्त मुख्य सचिव अभियंता विनायक पांडे, वसंतराव आसरे, अरुण काळे, नामदेवराव फुसे, पंजाबराव देशमुख, अनंत बाठे, भाष्करराव सावरकर, विजयसिंह चव्हाण, हरीदास ताठे, संजय चौधरी, संजय गाभणे, रमेश सरणे, भगवान राहणे, केशवराव वडतकर,सहदेव पाचपोर, पुरुषोत्तम ढास, सुधाकर उकर्डे, अंबादास नागापुरे, विठ्ठलराव कोकाटे, अरुण मसने, सारंगधर कराळे, प्रल्हाद दौड व जनार्धन गि-हे  यांचेसह ईतरही बहुसंख्य सेवानिवृत्त कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाचे संचालन, प्रास्तविक व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रदीप खाडे यांनी केले.

    Post Views:  196


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व