धनादेश अनादर प्रकरणी पती-पत्नींना दोषी


३ महिन्यांची साध्या कारावासाची शिक्षा व २ लक्ष ५० हजार दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास १ महिन्याचा अति
 विश्व प्रभात  02 Dec 2024, 8:58 PM
   

अकोला - येथील वि. 2 रे सह अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी  के. ऐ. भेंडवडे यांच्या न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणी आरोपी संतोष मधुकर खुमकर आणि सौ. सीमा संतोष खुमकर या पती-पत्नींना दोषी ठरवत तीन महिन्यांची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच ₹ २ लाख ५० हजार(दोन लाख पन्नास हजार रुपये) दंडाची शिक्षाही सुनावली. दंड न भरल्यास आरोपींना आणखी १ महिन्याचा साध्या कारावास भोगावा लागणार आहे.
 गोपाल मोहनदास झापर्डे व आरोपींमध्ये चांगले मित्रत्वाचे संबंध होते. आरोपींना त्यांच्या व्यवसायासाठी पैशांची गरज असल्यामुळे त्यांनी फिर्यादीकडून ₹ २ लाख १५ हजार उधार घेतले. यामध्ये  १५ हजार रोख तर ₹ २ लाख धनादेशाद्वारे दिले गेले. आरोपींनी दिलेले पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र वेळोवेळी टाळाटाळ केली. मार्च २०२० मध्ये आरोपींनी परतफेडीसाठी स्वतःच्या सह्यांसह दोन धनादेश दिले. परंतु, फिर्यादीने ते बँकेत वटविण्यासाठी दिले असता "फंड्स इनसफिशियंट" या कारणाने धनादेश न वटता परत आला.
फिर्यादीने कायदेशीर नोटीस पाठवून धनादेशाच्या रकमेची मागणी केली. मात्र, आरोपींनी रक्कम न देता टाळाटाळ केली. यामुळे फिर्यादीने भारतीय दंड संहितेतील एन. आय. अॅक्ट 138 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
........न्यायालयाचा निर्णय:
सदर प्रकरणात फिर्यादीच्या वतीने ऍड. धीरज शुक्ला यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. आरोपींना दोषी ठरवून न्यायालयाने तीन महिन्यांचा साधा कारावास व  २ लाख ५० हजार दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपींना १ महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल.
हा निकाल समाजासाठी बोधप्रद असून, कर्जफेडीबाबतच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी मार्गदर्शक ठरतो.

    Post Views:  127


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व