ग्राम निंबा येथे वीज पडून एक शेतमजूर ठार तर दुसरा गंभीर


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2022-10-07
   

(लुकमान शहा) - निंबा :  बाळापुर तालुक्यातील ग्राम निंबा येथे तीन शेतमजूर शेतात काम करीत असताना दुपारी तीनच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडला आणि अचानक वीज पडून एक शेतमजूर जागीच ठार झाला तर दुसरा शेतमजूर गंभीर जखमी झाल्याचे दुर्दैवी घटना ग्राम निंबा येथे भोरटेक शिवारामध्ये घडली आणि तिसरा शेतमजूर हे थरार पाहून जागेवर बेशुद्ध पडला.
बाजीराव उर्फ बिर्ला प्रकाश पहुरकर हे मृतकाचे नाव असून त्यांना आई वडिल आनी पत्नी आणी तीन मुली असल्याची माहेती आहे  विनोद तेलगोटे हे गंभीर जखमी झालेल्या शेतमजूर अकोला येथे सामान्य रुग्णालय  हलवण्यात आले.
आणि तिसरा मजूर शेख नदीम शेख मन्नान या शेत मजुराला अकोला येथे सामान्य रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
याघटनेची माहीति उरळ पोलिस ठाणेचे ठाणेदार अनंतराव वडतकार यांना मिळताच त्यांचे मार्गदर्शना खाली बिट जमादार संतोष भोजने, रवी हिंगणे . सोबत .निंबा गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राहुल तायडे यांनी पंचनामा करुण अनैसार्गिक रीत्या मृत्यृची नोंद करुण मृत्यूकाला PM साठी अकोला येथे पाठविण्यात आले.  राजू प्रल्हाद पहूरकर मूर्तकाचे चुलत भाऊ यांनी उरळ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. अनैसर्गिक रित्या मृत्यूची नोंद करून पुढील तपास निंबा बीटचे जमदार संतोष भोजने व रवी हिंगणे करीत आहे.  झालेल्या अनैसार्गिक रीत्या मृत्यू गरीब परिवाराला शासनाने व तसेच मोठे पद अधिकाऱ्यांनी मदत दियावी अशी मागणी निंबा गावातील . व .परिसरातील जनता करीत आहे.

    Post Views:  330


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व