गुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ व प्रार्थना मंदिराला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट


 Pankaj Deshmukh  2021-11-24
   

अमरावती, दि. २४ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे शांतीस्थान महासमाधीला आज भेट दिली . यावेळी महासमाधीवर त्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले . तसेच येथील प्रार्थना मंदिरालाही भेट दिली . राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवावी समाधीस्थळावरील शांतता व पावित्र्य मनाला संमोहित करणारे आहे . राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी ही भूमी पावन झालेली आहे . राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत प्रत्येकाने आपल्या मनात तेवत ठेवावी . हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल , असे श्री . कोश्यारी यावेळी म्हणाले . हे होते उपस्थित महापौर चेतन गावंडे , अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव जनार्दन बोधे , निवेदिता चौधरी , अध्यात्म विभाग प्रमुख डॉ राजाराम बोधे , जिल्हाधिकारी पवनीत कौर , उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे , तहसिलदार वैभव फरताडे , पोलीस अधीक्षक अविनाश ) बारगळ आदी यावेळी उपस्थित होते . अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळामार्फत राज्यपाल श्री कोश्यारी यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित गद्य पद्य ग्रंथ संपदा , ग्रामगीता तसेच शाल , श्रीफळ देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले .

    Post Views:  334


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व