लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पदाधिकारी पाल्य नितिशा धुत, स्मृती हुशे, वेदिका मुटे व स्वप्निल नवले 12 वी मध्ये गुणवत्तेने यशस्वी


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  10 Jun 2022, 2:14 PM
   

अकोला : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या चार पदाधिकार्‍यांच्या पाल्यांनी नुकत्याच निकाल लागलेल्या बारावीच्या परीक्षेत उच्चतम गुणानुक्रमाने उत्तीर्ण होण्याचा बहूमान प्राप्त केला आहे. 

यामध्ये आरडीजी महाविद्यालयाची विद्यार्थीनी नितीशा धुत हिने 93.68 टक्के गुण घेऊन नेत्रदिपक यश मिळवले आहे. ती पत्रकार महासंघाचे केंद्रीय कायदेविषयक मार्गदर्शक अ‍ॅड. नितीन धुत यांची मुलगी असून वडील आणि कुटूंबातील सदस्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत तीने सुद्धा एलएलबी आणि नंतर एलएलएम होण्याचा संकल्प करून कायद्याच्या क्षेत्रात सेवा देण्याचा संकल्प केला आहे. 
केंद्रीय कार्यकारिणीचे मार्गदर्शक सल्लागार पदाधिकारी प्रा. डॉ. संतोष हुशे यांची कन्या स्मृती हुशे हिने विज्ञान विषयातून 92.50 टक्के गुण मिळवून उल्लेखनिय यश संपादन केले आहे. ती डवले महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून आपल्या यशाचे श्रेय गुरुजन, आई-वडीलांचे संस्कार, शिस्त आणि लाभलेल्या वैचारिक वारशाला देते. तिने पुढे वैद्यकीय क्षेत्राकडे जाऊन आरोग्य सेवेमध्ये योगदान देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.  तिचे वडील अकोल्यातील ज्येष्ठ समाजसेवक प्रा. डॉ. संतोषभाऊ हुशे यांच्या समाजशील विचारांचा प्रभाव असलेल्या स्मृतीने सुद्धा वडीलांच्या आदर्शाचे अनुकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिने वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर होऊन आरोग्य सेवेतून समाजसेवा करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. 
तृतीय विद्यार्थीनी वेदिक मुटे ही सुद्धा विज्ञान विषयात 85 टक्के गुण घेऊन यशस्वी झाली आहे. ती पत्रकार महासंघाचे विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख किशोर मुटे, हिंगणघाट (वर्धा) यांची मुलगी आहे. तिचे वडील किशोर मुटे हे अ.भा.ग्राहक परिषदेचे सुद्धा वर्धा जिल्हा संघटक असून, आई कल्याणी मुटे ह्या किर्तनकार, प्रबोधनकार आहेत. तिला सुद्धा घरातून सामाजिक कार्याचा वैचारिक वारसा असून ती पुढे पदवी अभ्याक्रम करून एमपीएससीकडे वळणार आहे. 
चवथा विद्यार्थी स्वप्निल नवले याने सुद्धा विज्ञान विषयामधून 80.50 टक्के गुण प्राप्त करून उल्लेखनिय यश संपादन केले आहे. त्याचे वडील दिलीप नवले हे सुद्धा एक सेवाभावी व्यक्तिमत्व असून ते पत्रकारीतेसोबतच प्रिंटींग प्रेसच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या गुणवत्तप्राप्त चारही यशस्वी विद्यार्थ्याचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय-अध्यक्ष संजय एम. देशमुख व सर्व पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी सानंद शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. 

    Post Views:  365


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व