वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धर्मादाय संस्थेसाठी आवश्यक मान्यता
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Jul 2026, 12:01 PM
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सुपर स्पेशालिटी रुग्णालय, अकोला यांना आयकर अधिनियम, १९६१ अंतर्गत कलम १२ एबी व कलम ८० जी अंतर्गत आवश्यक नोंदणी व मान्यता प्राप्त झाली. या मान्यतेमुळे उद्योग समूह, सार्वजनिक उपक्रम, कॉर्पोरेट संस्था, सेवाभावी संस्था तसेच दानशूर व्यक्तींना संस्थेस सीएसआर निधी अथवा देणगीच्या स्वरूपात रुग्णोपयोगी साहित्य, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, औषधे, व्हेंटिलेटर, आयसीयु उपकरणे, डायलिसिस मशिन, मॉनिटर्स, रुग्ण बेड, व्हीलचेअर्स, स्ट्रेचर्स तसेच इतर आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देता येणार आहे.
संस्थेला प्राप्त झालेल्या १२ एबी नोंदणीमुळे आयकर अधिनियमांतर्गत धर्मादाय संस्थेसाठी आवश्यक वैधानिक मान्यता प्राप्त झाली असून ८० जी मान्यतेमुळे संस्थेस पात्र देणगी देणाऱ्या देणगीदारांना आयकर अधिनियमातील लागू नियम व अटींनुसार कर सवलतीचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे समाजोपयोगी कार्यासाठी उद्योग व दानशूर व्यक्तींचा सहभाग अधिक वाढण्यास मदत होणार आहे. सन २००२ मध्ये स्थापन झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे विदर्भातील महत्त्वाचे वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा केंद्र असून सन २०२४ पासून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची सेवाही सुरू झाली आहे. दररोज हजारो रुग्ण येथे उपचारासाठी येत असून अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीएसआर निधी व लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
अधिष्ठाता यांनी सर्व उद्योगसमूह सीएसआर निधी उपलब्ध असलेल्या कंपन्या, बँका, सार्वजनिक उपक्रम, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था आणि दानशूर नागरिकांना सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेऊन शासकीय आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी उदारहस्ते योगदान देण्याचे आवाहन केले आहे. ग्णांना होणारे प्रमुख फायदे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध होतील हेंटिलेटर, आयसीयु मॉनिटर्स डायलिसिस मशिन, पोर्टेबल एक्स-रे, अल्ट्रासोनोग्राफी व इतर आवश्यक उपकरणे आधुनिक निदान यंत्रसामग्री वेळेत व दर्जेदार उपचार अत्याधुनिक उपकरणांमुळे आजारांचे लवकर निदान, गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार शक्य. गरीब व गरजू रुग्णांना अधिक लाभ आवश्यक रुग्णोपयोगी साहित्य उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वैयक्तिक खर्च कमी होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार मिळण्यास मदत.
आयसीयु व आपत्कालीन सेवांची गुणवत्ता वाढेल अधिक बेड, मॉनिटर्स व जीवनरक्षक उपकरणे उपलब्ध होतील. आपत्कालीन परिस्थितीत उपचार क्षमता वाढेल. प्रतीक्षा कालावधी कमी होईल. अतिरिक्त उपकरणे उपलब्ध झाल्याने तपासण्या व उपचार जलद होतील. औषधे व आवश्यक साहित्याची उपलब्धता काही सीएसआर प्रकल्पांतून औषधे, सर्जिकल साहित्य, व्हीलचेअर, स्ट्रेचर, इन्फ्युजन पंप इत्यादी उपलब्ध करून देता येतात. रुग्ण व नातेवाईकांसाठी सुविधा प्रतीक्षालय, स्वच्छ पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, डिजिटल माहिती प्रणाली यांसारख्या सुविधा विकसित करता येतात. विशेष विभागांचा विकास कर्करोग, हृदयरोग, न्यूरोलॉजी, नवजात शिशु विभाग, ट्रॉमा केअर इत्यादींसाठी आधुनिक सुविधा उभारता येतात. वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना आधुनिक उपकरणांमुळे डॉक्टर व विद्यार्थ्यांना अद्ययावत प्रशिक्षण मिळते, ज्याचा लाभरुग्णसेवेलाही होतो. एकूण आरोग्य सेवेची गुणवत्ता उंचावते शासकीय रुग्णालयातील सेवा अधिक परिणामकारक, सुरक्षित व रुग्णकेंद्रित बनते. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथील देणगी समितीमधील अध्यक्ष डॉ. संजय सोनुने मा. अधिष्ठाता, सदस्य डॉ. प्रवीण सपकाळ वैद्यकीय अधिक्षक, सदस्य डॉ. अरविंद आडे, विभाग प्रमुख शल्यचिकित्साशास्त्र तसेच सी. एस. आर. समन्वयक श्री. अमोल शेंडे समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) संपर्क क्र. : ९३२५५१५५९० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 1