अकोला- पिंजर जिल्हा अकोला येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांची धाडसी कामगीरी. दिपक सदाफळे यांनी अगदी अंडर वाॅटर रेस्क्यु करुन तळाशी जाऊन (अंडर सपोर्ट अप कव्हरींग) देत खांद्यावर उचलून रेस्क्यु बोट मध्ये तैनात जवानांच्या ताब्यात दिले*
➡️.. पंढरपुर येथे 2014 पासुन आषाढी वारी करीता आपत्ती व्यवस्थापन सेवा व सुरक्षा देण्यासाठी जाणा-या अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची टीम दिपक सदाफळे जिवरक्षक यांच्या नेतृत्वात यावर्षी सुद्धा ईओसी वाळवंट पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रातील वारक-यांच्या रक्षणासाठी 27 जुन पासुन तैनात होती.आज आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संखेत वारकरी गोळा झाले आहेत यामध्ये आज दुपारी 5:00 वाजता चंद्रभागेत मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनचे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे,आणी पंढरपूर नगरपरिषदच्या अग्निशमन दलाची टीम मधील बोट चालक अक्षय भोसले, चोफखाना पोलीस स्टेशन अहमदनगर बंदोबस्त ईओसी वाळवंट पंढरपूर पो.काॅ. निलेश बळे,पोलीस मित्र अनिल सलमपुरे हे रेस्क्यु बोटद्वारे चंद्रभागा नदीपात्रात तैनात असताना अचानक एक व्यक्ती पाण्यात बुडतांना लोकांनी पाहला आणी नदीपात्रातील लोक आरडाओरडा करु लागले लगेचच क्षणाचाही विलंब न करता दिपक सदाफळे यांनी नदीपात्रात उडी घेत त्या व्यक्तीला मागुण पकडले परंतु पाणी खोल असल्या ती व्यक्ती तळाशी जायला लागला लगेच दिपक सदाफळे यांनी क्षणार्धात नेहमीप्रमाणे आपली कल्पकता वापरुन तळाशी गेले याचवेळी बोट चालक अक्षय भोसले यांनी बोट मधील अनिल याला लाईफरींग घेऊन सज्ज ठेवले आणि लगेच दिपक सदाफळे यांनी त्या बुडणा-या व्यक्तीला वर आणले आणि यावेळी या व्यक्तीला आजिबात घाबरुन जाऊ न देता आधार दिला.यावेळी विचारपुस केली असता या व्यक्तीने आपले नाव कृष्णा भिमराव भंडारे वय वर्ष (41) रा.सातारा जि.सातारा येथील असल्याचे सांगितले. तेव्हा यावेळी लगेच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांचे सहकारी मयुर सळेदार, सुरज ठाकुर,ऋशिकेश राखोंडे,विकी गाडगे, आणी नगरपरिषद पंढरपूर फायरमन कुशार तारे.यांनी या वक्तीला आधार देत आपल्या सुरक्षित ठिकाणी पोहचुन दिले.या यशस्वी रेस्क्यु ऑपरेशन चे जि.आ.व्य.अ.सोलापुर चे शक्तीसागर ढोले साहेब तसेच मुख्याधिकारी न.प.पंढरपूर अरविंद माळी साहेब,अग्निशमन अधिकारी न.प.पंढरपूर संभाजी कार्ले साहेब, आणी ईओसी वाळवंट चे माढा तहसीलदार विनोद रणवरे सर यांनी संपुर्ण टीमचे तोंडभरुन कौतुक केले.अशी पथक प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना दीली.