स्वातंत्र्यदिन समारंभात केंद्रप्रमुख सुभाष इंगळे यांचा सत्कार
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
24 Aug 2022, 6:33 PM
नवनिर्वाचित केंद्रप्रमुख श्री सुभाष इंगळे सर यांचा सत्कार व 15 ऑगस्ट उल्हासात साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली गणू पंचायत समिती बाळापुर येथे वाडेगाव केंद्राचे नवनिर्वाचित केंद्रप्रमुख श्री सुभाष इंगळे सर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ विमल शिवचरण डोंगरे यांनी शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुरलीधर रेवासकर सौ संगीता भटकर विकास वाडकर सर प्रमुख उपस्थित होते तेव्हा केंद्रप्रमुख साहेब यांनी विद्यार्थ्यांचे जॉनी पॉनिक सेतू अभ्यासक्रम याबद्दल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांची ही अभ्यासाची कृती पाहून आनंदित झाले व शाळेचा शाळेचा परिसर स्वच्छ समाधान व्यक्त केले तसेच 15 ऑगस्ट या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विमल डोंगरे यांनी शाळेत झेंडावंदन केले तेव्हा गावातील सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष हजर होते नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी महापुरुषावर भाषणे करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाहे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रेवास्कर सर यांनी केले मुलांना गोळ्या बिस्किट वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Post Views: 269