साईनाथ कॉलनी खडकी येथे शिवजयंती उत्साहात साजरी


वर्‍हाड विकास संस्था व छत्रपती शाहू यंग ब्रिगेडचा उपक्रम
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Feb 2023, 12:42 PM
   

अकोला : वर्‍हाड विकास बहुउद्देशिय क्रीडा व शिक्षण मंडल खडकी बुचे अध्यक्ष पंजाबराव वर तसेच छत्रपती शाहू यंग ब्रिगेड अकोलाचे अध्यक्ष रोशन गायकवाड यांचे संयुक्त विद्यमाने साईनाथ कॉलनी खडकी बु. येथे १९ फेबु्रवारी रोजी मा. नगरसेवक ंमंगेश काळे यांना ‘छत्रपती योद्धा’ तर तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष सुगत वाघमारे ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  मा. महादेवराव भुईभार, (उपाध्यक्ष : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म.रा तर उद्घाटक म्हणून  संग्रामभैय्या गावंडे (जिल्हाध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) प्रमुख मार्गदर्शक म्हणून  प्रा.डॉ. संतोष हुशे सर (बहुजन नेता, सामाजिक कार्यकर्ते),श्रीरंग सणस साहेब (पोलीस निरीक्षक, खदान), प्रमुख अतिथी- प्रा.डॉ. ममता इंगोले, अ‍ॅड. प्रवीण तायडे, (अध्यक्ष : अकोला बार असोसिएशन), वैâलास प्राणजाळे साहेब (आम आदमी पार्टी),  शंकरराव लंगोटे (सामाजिक कार्यकर्ते, खडकी बु.), बबनराव कानकिरड, (महासचिव: म.अं.नि.स.) बुलढाणा येथील सरकारी वकील अ‍ॅड. शेषराव काळे, प्रमोद  महाजन (बिल्डर) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांची शिवजयंतीपर अभ्यासपुर्ण समयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे अध्यक्ष आयोजक पंजाबराव वर तर आभार प्रदर्शन रोशन गायकवाड यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘छत्रपती गौरव’ पुरस्कार देऊन मान्यवरांचे हस्ते मोमेंन्टो, पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मोहीनी मते हीने जिजाऊ तर प्रतिक सम्रितकार याने शिवाजी महाराजांची वेशभुषा साकारली होती. यावेळी परिसरातील बालक श्रेयस सम्रीतकार, युवराज महल्ले यांनी पोवाडा सादर ़केला व कु. भार्गवी श्रीखंडे, शुभ्रा घोगरे, आराही पायघन या बालिकांनी उत्कृष्ठ डान्स करून श्रोत्यांची मने जिंकली.  

छत्रपती गौरव पुरस्काराचे मानकरी
युवराज विठ्ठल महल्ले,  अ‍ॅड. प्रजानंद उपर्वट, बबलू श्रीराम तायडे सर , कॅप्टन चंद्रकांत तायडे , मायाताई इरतकर , सागर वैâलास प्राणजाळे , डॉ. संजय निकस (पाटील), प्रतिभा शिरभाते (सामाजिक), रविंद्र वाघ, अ‍ॅड. श्याम काळे (ज्येष्ठ वकील, मेहकर), अ‍ॅड. ओमकुमार खंडारे, संतोष धरमकर , इंजी. राहुल इंगोले , टिना सतीश चक्रनारायण ,  कुणाल देशमुख, आशु देशमुख , सौ. संजना नाना बोरकर, रोशन गायकवाड , सौ. सुनंदा पंजाबराव वर , सौ. मनिषा भुजाडे (बचत गटाच्या सचिव), तुळशिदास खिरोडकर (सामाजिक कार्यकर्ते)
विशेष सत्कार :: सतीश मदनकार,पो.कॉ. विजय चव्हाण,पोलीस नायक - रवी डाबेराव, पो.काँ. नितीन मगर, पो.कॉ. कालुराम पवार, पो.कॉ. दिगांबर अरखराव यांना सन्मानित केले.  
कार्यक्रमाला - अनिल देशमुख, प्रभाकर मदनकार, चौबे साहेब, प्रल्हाद महल्ले,पांडुरंग बोर्डे साहेब, चंद्रकांत इंगळे (से.नि.सिईओ)-बोबडे साहेब, विठ्ठल महल्ले (पत्रकार),राजेश सम्रीतकार, निळुभाऊ तिजारे, संतोष बुंदेले, ज्ञानदेव डामरे, भागवत डामरे, महादेवराव महल्ले, नितीन वानखडे,  चक्रनारायण सर, संजना बोरकर, अश्विनी मते,अनिता कुकडे-वानखडे ताई, प्रफुल्ल महाळंकर-उके साहेब-उंबरकर सर सौ. शिला इंगळे-सौ. ऋतिका गोपाल देशमुख, अ‍ॅड.गवई साहेब,अ‍ॅड. ज्ञानेश्वर सालफळे,  महादेवराव डोईफोडे, जंजाळ सर, मेहरे साहेब, घोगरे साहेब-अतुल कुळकर्णी सर, तुषार हांडे, विशाल लांडे, अविनाश मोरे, ओरा चक्रे सर, वासुदेव चक्रनारायण, रामकुमार खंडारे, दादाराव वाहुरवाघ, पंजाबराव वर, दिनेश सरदार, मनिष गवई, अ‍ॅड. एकनाथ चक्रनारायण, अ‍ॅड. विजय वानखडे, अ‍ॅड. देवानंद गवई, अ‍ॅड. प्रजानंद उपर्वट, मनोज गायकवाड, बळीराम बोरकर, कवळकार काका, धोटे काका, वाघमारे सर,सुनीता महल्ले, माया उंबरकर, साधना उंबरकर,संजना बोरकर, दुर्गा पायघन, अनिता कुकडे, मृणाल कुलकर्णी, ज्ञानेश्वरी महल्ले, अश्विनी मते, ऋतिका देशमुख, दिपाली देशमुख, शिला इंगळे, वर्षा वानखडे, पार्वती राऊत, डोळे काकू, हट्टेवार ताई, जया देशमुख, गाडे काकू,उषा सम्रितकर, सोनोने काकू, ज्योती गायकवाड, कमल गायकवाड, साधना डामरे, कविता डामरे,दिपाली जोशी  तळेगांवकर, अल्काताई, खरे ताई,शोभा डामरे,इंगळे ताई  आदींची उपस्थिती होते.

    Post Views:  260


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व