देशमुख समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Jul 2022, 9:22 AM
   

अकोला : देशमुख महिला मंडळ आणि देशमुख समाज जागृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
इयत्ता दहावी आणि बारावीत यश संपादन करणाऱ्या तसेच उच्च पदावर नियुक्त झालेल्या सन्मानपत्र देशमुख समाजातील व्यक्तींचा सत्कार सोहळा रविवार दिनांक 24 जुलै 2022 रोजी दुपारी १ वा. स्थानिक मराठा मंगल कार्यालय रामदास पेठ येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून गणेशराव देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर स्मिताताई देशमुख उपस्थित असणार आहेत. सदर कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन समाज बांधवांना प्रोत्साहित करावे , असे आवाहन एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

    Post Views:  232


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख