देशमुख समाजातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दि.१६ जुलै रोजी


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  14 Jul 2023, 6:05 PM
   

अकोला - शैक्षणिक पात्रतेचे उंबरठे ओलांडत भावी आयुष्यात यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या समाजातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक होणे क्रमप्राप्त असते.अशा विद्यार्थ्यांना आयुष्याच्या वाटचालीत पुढे जातांना सकारात्मक प्रोत्साहनाचे बळ प्राप्त व्हावे म्हणून देशमुख समाजातील १० वी व १२ मधील गुणवत्ताप्राप्त  विद्यार्थांच्या या सन्मान समारंभाचे आयोजन रविवार  दि.१६ जुलै रोजी दुपारी  १.३० वाजता जि.प.कर्मचारी भवन,पोलीस स्टेशनच्या बाजूला,सिव्हील लाईन्स अकोला येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून निर्माण ग्रूपचे संस्थापक - अध्यक्ष  समाजसेवी श्री गणेशराव देशमुख,तर प्रमुख अतिथी म्हणून कॉंग्रूस नेते व जन अभियान फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री अविनाशजी देशमुख व प्रसिध्दी अस्थिरोग तज्ञ ओम् मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.श्री रणजित देशमुख उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी पूर्वनोंदणी झालेल्या दहावी- बारावी आणि एम.पी.एस.सी व युपीएससी मधील यशस्वी होऊन निवड झालेल्या गुणवंतांचा  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळाच्या वतीने व  देशमुख समाज जागृती मंडळ आणि देशमुख महिला मंडळाच्या सक्रिय सहकार्याने अकोला जिल्ह्यातील देशमुख समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या नेत्रदिपक यशाचा गौरव म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले  आहे. तरी देशमुख समाजाकडून आयोजित या कौतुक सोहळ्यात जास्तीत जास्त समाजबांधवांनी आपल्या पूर्वनोंदणी केलेल्या आपल्या गुणवत्ताप्राप्त मुला मुलींसह सहभागी व्हावे असे आवाहन अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळ अध्यक्ष संजय एम.देशमुख,निंबेकर,उपाध्यक्ष के.व्ही देशमुख, डोंगरगावकर, सौ.कल्पनाताई देशमुख सचिव अश्विन देशमुख, महिला मंडळ अध्यक्षा सौ.राजश्री  देशमुख, जागृती मंडळ अध्यक्ष संजय देशमुख कंझारेकर सचिव नितीन देशमुख,व तिनही मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

    Post Views:  157


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व