देवकाबाई देशमुख शाळेत कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी, काल्याचे कीर्तन


 संजय देशमुख  23 Aug 2022, 7:14 PM
   

भाजप नेते तथा नगरसेवक आशिष पवित्रकार आणि मित्रपरिवाराच्या वतीने जवाहर नगर भागातील छत्रपती संभाजी महाराज पार्क येथे दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. शहर आणि जिल्ह्यातील अनेक गोविंदा पथकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि थरारक रोमांचकारी थरांचा मनोरा रचत त्रिमूर्ती गणेश मंडळ यांनी ही मानाची दहीहंडी फोडली.
दहीहंडी उत्सवाला आमदार गोवर्धन शर्मा, माजी मंत्री डॉ. रणजित पाटील, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर सहकुटुंब उपस्थित होते. ठाणेदार भानुप्रताप मडावी, भाजप नेते डॉ. अशोक ओळंबे, हरिशभाई अलिमचंदाणी, राहुल पाटील, सतीश ढगे, दीपक मायी, जीवनराव देशमुख, डॉ. सुभाष भडांगे, शिवलाल बोर्डे, काका सावरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साई मेगा मार्ट कोठारी क्रेन सर्व्हिसेस, आरजे गौरव राव, चहा हॅपिनेस, आकाश साऊंड आणि संकेत साबळे प्राॅडक्शन यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आशिष पवित्रकार यांच्यासह मनोज कस्तुरकर, पवन सुर्वे, गणेश पाठक, राजू ओळंबे, आकाश डोंगरे, ऋषिकेश धुत, अभिषेक कवडे, योगेश पवित्रकार, शेखर प्रतीक कालमेघ तसेच सर्व मित्रपरिवार भाजप कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक यांनी प्रयत्न केले.

    Post Views:  286


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व