सुपर स्टार यांना दिलेला आऊटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द इंडिया अवॉर्ड प्रा.राजेश ताले यांना प्रदान !


 विश्व प्रभात  29 Dec 2024, 9:08 PM
   

माझोड(अकोला) चे सुपुत्र,स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा.राजेश पाटिल ताले यांना  देऊन सन्मानित करण्यात आले. हैद्राबाद येथे Novotel HICC Convention Center मध्ये दि.26 डिसें ते 30 डिसें 2024 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या  69th JCI International Convention  मध्ये यावर्षीचा राष्ट्रीय स्तरावरील सर्वात मानाचा मानल्या जाणारा आऊटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द इंडिया अवॉर्ड :-2024 स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन अध्यक्ष,युथ आयकॉन  प्रा.राजेश पाटिल ताले यांना जेसीआय चे जागतिक अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. याच पुरस्काराने सुपर स्टार अमिताभ बच्चन,सचिन तेंडूलकर यांनाही सन्मानित करण्यात आलेले आहे. 
याद्वारे राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

    Post Views:  120


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व