आ. रणधीर सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बहुकल्यानकारी योजनांच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


हजारो नागरिकांनी घेतला शिबीराचा लाभ
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  14 Apr 2022, 8:05 PM
   

अकोला : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व अकोला पूर्वचे लोकप्रिय आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्राम पंचायत कार्यलय प्रांगण बाभूळगाव जहाँगीर येथे १४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत नवीन राशन कार्ड, राशन कार्ड दुरुस्त करणे, संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे अर्ज भरणे, ई श्रम कार्ड काढणे, उज्वला गस योजनेचे फॉर्म भरणे, बांधकाम कामगार सदस्य नोदणी, कोविड लसीकरण प्रमाणपत्र आदी बहुकल्याणकारी शासकीय योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

शिबिराला प्रमुख उपस्थिती अनुप धोत्रे, माधव मानकर,  चंद्रशेखर पांडे गुरुजी,अंबादास उमाळे, प्रवीण पाटील, सरपंच प्रतिभाताई गणेशराव गावंडे, प्रमोद  ढोमणे, किशोर  काकडे, देवेंद्र देवर, विनायक पाटील, रवी गावंडे, विठ्‍ठलराव इंगळे, अनुप काकड, विशाल जयस्वाल, उमेश गावंडे, संतोष कोकाटे, संतोश डोंगरे, प्रशांत उबाळे, आशिष बोबडे, गोपाल चव्हाण, किशोर हागवणे, सतीश गावंडे, , नितीन तोंडे, निलेश काकड, नितीन भगत, गजानन वानरे, अमोल तावरे, सशेर पठाण,भुषण बढे, अतुल हगवणे, अंकुश साबळे, निखिल बढे,  यांची लाभणार होती. यावेळी मान्यवरांचे आयोजन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर शिबिराचे उदघाटन अनुप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना त्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या बहुकल्यानकारी शिबीराचे आयोजक भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पांडे गुरुजी, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील हगवणे यांचे कौतुक केले. या शिबिराचा लाभ परीसरातील हजारो नागरिकांनी घेतला. यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी आयोजक  आयोजक मंडळींनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर पांडे गुरुजी तर आभारप्रदर्शन प्रविण पाटील हगवणे यांनी केले.

    Post Views:  194


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व