सरेवाडी शाळेत लोकमान्य टिळक टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
02 Aug 2022, 1:58 PM
पुणे : १०० टक्के आदिवासी क्षेत्रातील सरेवाडी शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर जयंती साजरी करण्यात आली.दोन्हीही महापुरूषांच्या जीवनावरील विविध प्रसंग विद्यार्थ्यांना टीव्हीवर दाखवण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वैयजंता आणि फकीरा प्रसिद्ध कादंबऱ्या होत्या. लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवासवर्णने,कथा,कविता व गीते त्यांनी लिहिली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीय काहीली अशा सुंदर कविताही लिहिल्या.अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे टीव्हीवर ऐकविण्यात आले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.स्वातंत्र्य लढ्यातील टिळक पर्व व त्यातील महत्त्वाच्या घटना या विद्यार्थ्यांना प्रकर्षाने भाषणाद्वारे कथीत करण्यात आल्यात. लोकमान्यांच्या वरील छोटे छोटे व्हिडिओ यूट्यूब च्या माध्यमातून दाखवण्यात आले. याप्रसंगी शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या सौ. हिराबाई ठोकळ, अंगणवाडीताई सौ.सुलाबाई ठोकळ, श्री.दिलीपजी ठोकळ, श्री.सचिनची ठोकळ ही उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री.बापूराव दराडे व श्री.विजयकुमार शेटे यांनी मार्गदर्शन व नियोजन केले.
Post Views: 445