महर्षी कर्वेतील मुख्याध्यापक संजय करपे यांचा सेवा पूर्ती कार्यक्रम


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Oct 2022, 12:53 PM
   

पुणे : सेवापूर्ती समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल येथील मुख्याध्यापक संजय करपे यांच्या प्रदीर्घ ३६ वर्षाच्या सेवेनंतर सेवापुर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्था व विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावतीने गौरव व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला.
सर्व मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक संजय करपे व यांच्या पत्नी यमुना करपे यांच्यासह शाला समिती अध्यक्षा सीमा कांबळे यांच्या हस्ते भेटवस्तु,शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव म्हणाले, सेवानिवृत्ती नंतरही करपे सर संस्थेच्या कार्यात सहभागी होतील व आपल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी करतील.
तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले, सामाजिक कार्यात रस घेऊन भविष्यात अधिकाधिक सामाजिक कार्यात अग्रेसर रहावे. संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, सचिव डॉ. पी.व्ही.एस शास्त्री, उपसचिव प्रदीप वाजे, शाला समिती अध्यक्षा सीमा कांबळे, महिलाश्रम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे, उपमुख्याध्यापक विष्णू मोरे, शिशुविहारच्या  मुख्याध्यापिका कल्पना वानखेडे, प्राचार्या सविता रानडे, गुणवत्ता वाढ व विकास समिती अध्यक्षा उमा जोशी, वैशाली पोतदार व विविध शाखेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सन्मान पत्राचे वाचन पर्यवेक्षक सतीश केंगार यांनी तर आभार वैशाली सैंदाणे यांनी मांनले.

    Post Views:  162


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व