बालगृहातील मुलांची एकदिवसीय सहल।संपन्न .
In the best interest of child
ह्या उद्देशाने बालगृहातील बालकांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून अकोला जिल्ह्यातील बालगृहातील बालकांची एक दिवसीय सहल मा.सदस्य, बाल हक्क संरक्षण आयोग , मा. बाल कल्याण समिती तसेच मा.बाल न्याय मंडळ यांचे माध्यमातून शेगाव मार्गावरील अकोल्यापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या राधाकुंज, निसर्ग व पर्यटन स्थळ , अंत्री मलकापूर येथे नेण्यात आली होती . ह्या सहलीमध्ये अकोला जिल्ह्यातील चारही बालगृहातील सर्व बालकांना सहलीला नेण्यात आले.
ह्या सहलीला शासकीय बालगृह ,गायत्री बालिकाश्रम , उत्कर्ष शिशुगृह आणि सूर्योदय बालगृह मधील बालक व बालिका सहभागी झालेत. सहलीमध्ये जाण्यासाठीच्या बसेसला जिल्हा विधी प्राधिकरण सेलचे सचिव मा. न्यायाधीश योगेश पैठणकर आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग सदस्य मा. ऍड. संजय सेंगर यांनी बाल कल्याण समिती अध्यक्ष मा.ऍड. अनिता गुरव , सदस्य मा.डॉ.विनय वसंतराव दांदळे ,सदस्य मा. राजेश देशमुख , सदस्य मा.ऍड.शीला तोष्णीवाल यांचे उपस्थितीत हिरवी झेंडी दाखविली .
पर्यटनस्थळी पोहोचताच सर्व बालकांचे बँड ताश्याच्या गजरात स्वागत करण्यात आले.
सर्वप्रथम स्वयंभू महादेवाचे दर्शन घेऊन पोटभर नाश्ता करून दिवसभर बालकांनी विविध प्रकारचे खेळ , धमाल मस्ती डान्स , रेन डान्स , स्विमिंग सह विविध प्रकारचे खेळ खेळण्यांसह धमाल मस्ती केली . सकाळचा नाश्ता , दुपारचे जेवण आणि सायंकाळी पाणीपुरीसह ज्यूसचा आस्वाद घेतल्यावर पसायदानाने या सहलीची सांगता झाली . दिवसभर ह्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची एक वेगळीच झलक होती . राधाकुंज पर्यटन स्थळाचे सर्वेसर्वा मा. अरविंदजी देठे हे स्वतः सर्व बालकांसोबत दिवसभर होते आणि त्यांनी स्वतः बालकांना आणि सहभागी मान्यवरांना सर्व स्थळांची माहिती दिली .ही संपूर्ण सहल अकोला नगरीतील प्रतिष्ठित मान्यवरांच्या आर्थिक सहकार्याने संपन्न झाली . बालगृहापासून तर पर्यटन स्थळीं बालकांना ने आण करण्यासाठी पूर्ण सहकार्य प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी आपल्या स्कूल।च्या चार बसेस देऊन सहकार्य केले , संकल्प मित्र परिवारतर्फे अमोल पाचकवडे, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा , मा. विजय कुमार जानी ,दिनेश कवडे , ऍड. तायडे , सूरज भांगे , नीरज आवंडेकर , निखिल खंडेलवाल यांचेसह मान्यवरांनी सहकार्य केले. या सहलीमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडुलकर ,सचिन घाटे , सरकटे , रेवत खाडे , निलेश पेशवे ,चाईल्ड लाईनचे आणि रेल्वे चाईल्ड लाईनचे कर्मचारी यांचेसह शासकीय बालगृहचे अधीक्षक सौ. जयश्री हिवराळे, सूर्योदय बालगृह चे समन्वयक शिवराज पाटील खंडाळकर , गायत्री बालिकाश्रम चे अधीक्षक वैशाली भटकर , भाग्यश्री , उत्कर्ष शिशुगृह चे अधीक्षक प्रीती दांदळे सर्व बालगृह चे अधीक्षक , काळजीवाहक आणि कर्मचारी यांनी सहभागी होऊन सहल यशस्वीतेसाठी मेहनत घेतली .
Post Views: 214