११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी यांची एल. आर. टी. कॉलेजच्या एन. सी. सी. युनिटला भेट


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  30 Nov 2022, 4:53 PM
   

दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील एन. सी. सी. युनिटला ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अकोल्याचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी यांनी भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके यांनी कर्नल बिजॉय चौधरी यांचे शॉल, श्रीफळ व बुके देऊन स्वागत केले तसेच महाविद्यालयात एन. सी. सी. युनिट द्वारे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. कर्नल बिजॉय चौधरी, यांनी एन. सी. सी. विभागातील वेगवेगळ्या प्रकारच्या फाईलींगचे परीक्षण केले. यावेळी आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल उपस्थित होते. एन. सी. सी .युनीट प्रमुख कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कॅडेट सोबत हितगूज करतांना कर्नल बिजॉय चौधरी यांनी आपल्या व्याख्यानामध्ये एन. सी. सी. विभागाने राबविलेले वेगवेगळे उपक्रम व कॅडेट्सनी थल सैनिक कॅम्प, रिपब्लीक डे कॅम्प तसेच इतर स्पर्धेमध्ये मिळविलेल्या यशाचे कौतुक केले. कॅडेट्सला त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन केले. कॅडेट्सनी ज्या प्रमाणे अनुशासन व शिस्तीचे पालन केले त्यासाठी त्यांचे व कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांचे कर्नल चौधरी यांनी कौतुक केले. या कार्यक्रमला दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवींद्रजी जैन, मानद सचिव श्री. पवनजी माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजितजी परांजपे व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांचे सहकार्य लाभले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी  सीनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे, जूनियर अंडर ऑफिसर मिनल रेड्डी, जूनियर अंडर ऑफिसर श्याम ढोरे, सार्जंट जयश्री हरसुलकर, सार्जंट ऋषिकेश पटेल, कॉर्पोरल शिवानी अवातिरक, कॉर्पोरल ओम डांगे, कॉर्पोरल प्राजक्ता नारखेडे, कॉर्पोरल वैष्णवी ढेंमरे, कॉर्पोरल कार्तिक लाडगे, कॉर्पोरल सागर वानखडे, कॅडेट अवंतिका खंडार, कॅडेट वैष्णवी पांडे, कॅडेट साक्षी ठाकरे, कॅडेट पुर्वा देवघरे, कॅडेट रेशमा गालफाडे, कॅडेट साक्षी पांडे, कॅडेट गीता गावंडे, कॅडेट साक्षी गुप्ता, कॅडेट नैना टोंगऴे, कॅडेट तनाया नाफाडे, कॅडेट स्नेहल गायकवाड़, कॅडेट किरण माने, कॅडेट मयुरी बरदिया, कॅडेट सलोनी यादव, कॅडेट महेश मोकलकर, कॅडेट धनंजय लाटे, कॅडेट रोहन साबे, कॅडेट साहिल बहाड, सहिल बुंदेले, कॅडेट धनश्री चव्हाण व इतर सर्व कॅडेट्स व यांच्यासोबत महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

    Post Views:  216


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व