येत्या १० ऑगस्ट रोजी अकोला जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या तत्त्वावधानात रामदासपेठेतील पार्थसारथी शुक्ल सभागृहात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी संध्याकाळी घोषित होईल. त्याचबरोबर राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत निवड झालेल्या योगपटूंची निवडही घोषित होईल, अशी माहिती जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव अरविंद जोध यांनी दिली.
पारंपरिक योगासन, कलात्मक एकल व दुहेरी आणि तालात्मक दुहेरी योगासन अशा चार प्रकारात ही स्पर्धा होईल. ९ ते १४, १४ ते १८ आणि १८ वर्षावरील अशा तीन वयोगटात ही स्पर्धा होईल. ३१ मार्च २०२२ रोजी स्पर्धेतील वयोगटाची अट पूर्ण करणारे योगपटू यात सहभागी होऊ शकतील. जिल्ह्यातील योगसंस्था व शाळा-महाविद्यालयातील योगपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन अकोला जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या स्पर्धेचे प्रवेशअर्ज भरण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर आहे.
अधिक माहितीसाठी अकोला जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर राऊत (७३८७५९६२१५), सचिव अरविंद जोध (९९२३४५८५४७), प्रदीप भडंग (९४२३१६०६४८), गोपाल अग्रवाल (९८२३२५७१०८), सारिका तिवारी (७७६९०७६१६९) यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील योगपटूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.