गुरुग्राम - समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांचं दिर्घ आजारानं निधन झाले आहे. गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु वयाच्या ८२ व्या वर्षी मुलायम सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. ३ वर्षापासून मुलायम सिंह यादव यांची तब्येत खराब होती. महिन्यातून २-३ वेळा ते हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल व्हायचे. परंतु ऑगस्ट महिन्यापासून मुलायम यांची तब्येत खालावत चालली होती.
२२ ऑगस्टपासून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. २ ऑक्टोबरला दुपारी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब कमी झाला होता. मुलायम सिंह यादव यांना श्वसनाचा-रक्तदाबाचा त्रास होता. डॉ. नरेश त्रेहान आणि डॉ. सुशीला कटारिया त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. मुलायम सिंह यादव यांना युरिन इन्फेक्शनची समस्या आहे.
अलीकडेच पत्नीचं झालं होतं निधन
मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे ९ जुलै २०२२ रोजी निधन झाले होते. त्यांना रक्तदाबासह मधुमेहाचा त्रास सुद्धा होता. साधना गुप्ता या मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्या औरैया येथील विधुना येथील रहिवासी होत्या. १९८० मध्ये त्यांची पहिल्यांदा मुलायम सिंह यादव यांच्यासोबत भेट झाली होती. साधना गुप्ता यांचेही यापूर्वी लग्न झाले होते. पण, त्या आपल्या पतीसोबत जास्त काळ राहिल्या नाहीत आणि चार वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता. ज्यानंतर साधना गुप्ता आणि मुलायम सिंह यादव यांचे लग्न झाले. साधना गुप्ता या मुलायम सिंह यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान होत्या.
Post Views: 206
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay