अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली गणू पंचायत समिती बाळापूर येथे मेळावा 2 व सत्कार समारंभ नुकताच जि प शाळा चींचोली गणू या या ठिकाणी शाळा पूर्व तयारी दोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ विमल डोंगरे व शिक्षक वृंद यांनी गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेण्याकरता गावातील सर्व नागरिकांना विनंती केली. बाळापूरचे गट समन्वयक नरेंद्र भाऊ कडू यांनी मेळाव्याचे पीककापून उद्घाटन केले. पहिलीमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका विमल डोंगरे यांची पदोन्नती झाल्याबद्दल शाळेच्या शिक्षिका भटकर यांनी त्यांचे स्वागत केले. या मेळाव्याचे प्रास्ताविक श्री रेवस्कर यांनी तर आभार प्रदर्शन श्री बाहेर यांनी केले मेळावा दोन साजरा करण्याकरता शाळेतील शिक्षक वृंद श्री वारकर रेवस्कर भटकर व बाहे सर यांनी अथक प्रयत्न केले याप्रसंगी माननीय कडू सर यांनी शिक्षक वृंद यांनी केलेल्या कार्याबद्दल व शाळेतील साफसफाई बदल समाधान व्यक्त केले व मेळाव्याची सांगता करण्यात आली.
Post Views: 178