सरेवाडीत वेशभूषा स्पर्धा व रास दांडिया*


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 Oct 2022, 11:06 PM
   

  पुणे......जि.प.प्राथ.सरेवाडी (नायफड) शंभर टक्के आदिवासी क्षेत्र,भीमाशंकर च्या पायथ्याशी वसलेली शाळा येथे वेशभूषा स्पर्धेचे रास दांडियाचे आयोजन करण्यात आले. वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण भूमिका सार्थक ठोकळ पहिली, द्वितीय क्रमांक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भूमिका रसिका भाऊ ठोकळ दुसरी, तृतीय क्रमांक राजकुमारी भूमिका शिवानी राजू ठोकळ चौथी, उत्तेजनार्थ झाशीची राणी लक्ष्मीबाई भूमिका गौरी एकनाथ ठोकळ चौथी,   अशा पद्धतीने वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या व विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.
    नवरात्रीच्या आदिमाया, आदिशक्तीचे पूजन करून विद्यार्थ्यांनी रास दांडिया खेळून आनंद मिळवला.आपल्या भारत देशात अनेक प्रकारचे सण उत्सव साजरे करण्यात येत असतात. श्रावण महिना सुरू झाल्यापासून अनेक हिंदू सण येत असतात. श्रावण महिना हा सणांचा महिना असतो त्या महिन्यापासून आपल्या हिंदू सणांना सुरुवात होते. आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांपैकी नवरात्र उत्सव हा एक महत्त्वपूर्ण सण आहे, नवरात्री उत्सव हा मोठ्या उत्साहात आणि आनंदाने संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. नवरात्री उत्सव नऊ दिवस चालतो. आपल्या अनेक हिंदू सण आणि उत्साहाने पैकी नवरात्री या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.  नवमी दरम्यान आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने शारदीय नवरात्रौत्सव साजरा करीत असतो. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्री उत्सवामध्ये अनेक जण उपवास पकडतात. त्याचप्रमाणे काही जण नऊ दिवस चप्पल घालत नाही. नऊ दिवस मोठ्या आनंदाने दुर्गा मातेची पूजन करतात. नवरात्र मध्ये असणाऱ्या नऊ दिवसालाही खूप महत्व आहे. या दिवसांना माळ असे म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या नऊ माळी असतात. प्रत्येक महिला प्रत्येक दिवसाला वेगळा रंग असतो. नवरात्रीच्या नऊ दिवशी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करण्यात येतात. नवरात्री हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वपूर्ण असा उत्सव आहे. नवरात्र उत्सवामध्ये गरबा आणि दांडिया हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळण्यात येत असतो.समवेत पालकांनी व ग्रामस्थांनी आनंद लुटला. शालेय अध्ययन-अध्यापनास लागणाऱ्या खडू,फळा,दैनंदिन रजिस्टर,संगणक व प्रिंटर यांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी  मुख्याध्यापक श्री. बापूराव दराडे, धाबेवाडी शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत केंगले, श्री.एकनाथ ठोकळ, नायफड ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सौ.अलकाजी रहाणे (कोकणे), अंगणवाडीताई सौ.सुलाबाई ठोकळ,ॲड रोहित ठोकळ, श्री.सचिन ठोकळ, श्री.दिलीपशेठ ठोकळ, सौ.कुसुमताई ठोकळ,सौ. अनिताताई ठोकळ, श्री.किसनभाऊ ठोकळ उपस्थित होते. श्री.विजयकुमार शेटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले.
         खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.जीवनजी कोकणे, पालक व ग्रामस्थ यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

    Post Views:  227


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व