श्रद्धासागर येथे रिंगण संत मुक्ताबाई वार्षिकांकाचे सत्यपाल महाराज यांच्या शुभहस्ते प्रकाशन संपन्न
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
13 Aug 2022, 2:07 PM
आकोला : वारकरी संत आणि त्यांचे जीवन कार्याचा वास्तव परिचय सर्वसामान्यांना व्हावा, यासाठी रिंगण वार्षिक विशेषांक दरवर्षी प्रकाशित होतो. यावर्षीचा 10 व्हा रिंगण संत मुक्ताबाई विशेषांकाचे प्रकाशन श्री क्षेत्र श्रद्धासागर आकोट येथे संपन्न झाले.
श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेद्वारा आयोजित रिंगण विशेषांकाचे प्रकाशन प्रख्यात समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज चिंचोळकर यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचेअध्यक्ष स्थानि संस्थाध्यक्ष वासुदेवराव महल्ले पाटील हे होते .या रिंगणात मुख्यअतिथी म्हणून रिंगण विशेषांकाचे मुख्य संपादक सचिन परब , कैवल्य आश्रम श्री क्षेत्र कसूराचे अध्यक्ष प्रशांत महाराज ताकोते प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झाले होत. याप्रसंगी दर्यापूरचे प्रसिद्ध साहित्यिक विजय विल्हेकर, रामराव महाराज, अध्यक्ष मुक्ताई संस्थान मेहून आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या संत साहित्याच्या रिंगणात रसिकांची व भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. रिंगण वार्षिकांकाचे प्रकाशन समारंभाचे निमित्ताने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक लोकयात्रेचे रिंगण या विषयाव परिसंवाद संपन्न झाला या परिसंवादात रिंगणचे संपादक सचिन परब मुंबई,संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रशांत महाराज ताकोते प्रमुख वक्ते म्हणून रसिक श्रोत्यांना रिझवून ठेवले.हा परिसंवाद म्हणजे श्रोत्यांसाठी एक खास मेजवाणी ठरला. यावेळी संस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व मुक्ताईची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन नंदकिशोर हिंगणकर, आभार रवींद्र वानखडे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन गजानन दुधाळ यांनी केले होते. यावेळी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे विश्वस्त, व्यवस्थापक व सर्व कर्मचारी वर्ग यांच्यासह पुरुषोत्तम लाजूरकर, अंबादास महाराज मानकर, माधवराव ठाकरे, शेतकरी संघटनेचे सतीश देशमुख, प्राध्यापक गौरखेडे यांच्या सह अनेक मान्यवर मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते. अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे दिली आहे.
Post Views: 371