शिस्तभंगामुळे माजी शाखा डाकपाल सक्तीने सेवामुक्त


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  09 May 2024, 2:25 PM
   

अकोला : टपाल खात्याच्या सेवेत असताना शिस्तभंग केल्याबद्दल एका शाखा डाकपालाला सक्तीने सेवामुक्त करण्याची कारवाई प्रवर डाक अधिक्षकांनी केली आहे.  प्रवर अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, कु. कांचन प्रभाकर वाकोडे या निंबी मालोकार (लेखा कार्यालय ताजनापेठ) येथे शाखा डाकपाल असताना त्यांनी शिस्तभंग केल्याने त्यांच्याविरुद्ध ग्रामीण डाकसेवक (आचरण व करार) नियमावलीनुसार कारवाई सुरू करण्यात आली. विभागीय चौकशी झाल्यावर त्यांना दि. 24 एप्रिलपासून सक्तीची सेवामुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रवर अधिक्षकांनी कळवले आहे.

    Post Views:  66


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व